खेडमध्ये इमारत कोसळून, तीन मजूर ठार

Last Updated: Tuesday, February 18, 2014, 08:37

रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये महाडनाका इथं बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळून तीन मजूर ठार झाले आहेत.

`पृथ्वी`क्षेपणास्त्राच्या वेगाने मंत्रिमंडळ बैठकीत १३ निर्णय

Last Updated: Wednesday, January 15, 2014, 15:30

निर्णय घेण्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांवर नेहमीच टीकेची झोड उठवली जात असतांना, पृथ्वीराज चव्हाण आज अचानक कामाला लागले आहेत.

गब्बर, `दगडू` नही डरेगा, `थ्रीडी शोले` के सामने लढेगा

Last Updated: Saturday, January 4, 2014, 22:27

मराठीतला `टाईमपास` सिनेमा हाऊस फुल सुरू असतांना, विश्लेषकांनी या सिनेमाला जाडजूड भिंग लावून पाहण्याचं सुरूच ठेवलं आहे. `टाईमपास` असं या सिनेमाचं नाव असतांना प्रकरण फारसं गंभीर घ्यायचं काही कारणचं नाहीय.

माझा नाही, हा दिल्लीकरांचा विजय - अरविंद केजरीवाल

Last Updated: Sunday, December 8, 2013, 17:35

आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदार संघातून दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा तब्बल २२ हजार ६८२ मतांनी पराभव केला. त्यानंतर केजरीवाल यांनी हा माझा नाही तर दिल्लीकरांचा विजय असल्याची प्रतिक्रिय़ा दिलीय.

अरविंद केजरीवाल यांची झाडू आणि आपची जादू

Last Updated: Sunday, December 8, 2013, 14:10

दिल्लीतलं काँग्रेसचं जहाज कुणी बुडवलं असेल तर ते `आम आदमी पार्टी`नं... आम आदमी पार्टी सर्वात मोठा पक्ष ठरला नसला तरी राजधानी दिल्लीत काँग्रेसच्या शीला दीक्षित सरकारचा सुपडा साफ करण्यात आपची `झाडू`च कारणीभूत ठरली. आम आदमीच्या या घवघवीत यशाचा सूत्रधार होता एक आयआयटीचा मॅकेनिकल इंजिनिअर, अरविंद केजरीवाल.

विवाहापूर्वी `ते` बिनधास्त करा - शर्लिन चोप्रा

Last Updated: Tuesday, December 3, 2013, 19:41

सातत्याने या ना त्या कारणाने प्रसिद्धी झोतात असणारी बिनधास्त आणि बोल्ड अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने धक्कादायक विधान केले आहे. विवाहापूर्वी सेक्स करायलाच पाहिजे, असे बेधड वक्तव्य शर्लिन हिने केलंय.

रेल्वेखाली तीन जणांचा चिरडून मृत्यू

Last Updated: Wednesday, November 27, 2013, 17:48

सांगली जिल्ह्यात मिरजजवळ आज सकाळी रेल्वे अपघातात तिघांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे.

जेजुरीजवळ भाविकांचा टेम्पो दरीत कोसळला, तीन ठार

Last Updated: Monday, November 25, 2013, 14:14

उरळीकांचन-जेजुरी रस्त्यावरील शिंदवणे घाटात भाविकांना घेऊन जाणार टेम्पो दरीत कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात तीन भाविक ठार झाले आहे. या टेम्पोमध्ये ४० ते ५० भाविक प्रवास करीत होते.

केजरीवाल- शीला दीक्षितांमध्ये ‘सीएम डिबेट’?

Last Updated: Thursday, October 24, 2013, 15:59

‘आम आदमी पार्टी’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना औपचारिकरित्या सार्वजनिक चर्चेचं आमंत्रण दिलंय.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात, पुण्याचे ३ ठार

Last Updated: Saturday, August 17, 2013, 23:41

पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर टायर फुटल्याने इनोव्हा मोटार डिव्हाडरवर आदळून झालेल्या अपघातात तीन तरुण ठार झाले आहेत. तर दोन जण गंभीर जखमी झाले.

मुंबई-गोवा हायवे अपघातात ३ ठार, १५ जखमी

Last Updated: Monday, March 25, 2013, 13:03

मुंबई-गोवा महामार्गावर अपघांची मालिका सुरूच आहे. आज सकाळी झालेल्या अपघातात ३ ठार तर १५ जण जखमी झालेत. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुण्यात ३ दिवसांत ११ तरूण-तरूणींची आत्महत्या

Last Updated: Thursday, November 1, 2012, 23:35

पिंपरी-चिंचवडमध्ये एका आय.टी कंपनीत काम करणा-या २२ वर्षांच्या तरुणानं आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आलीय.

नौदलातील हेलिकॉप्टरला अपघात, तिघांचा मृत्यू

Last Updated: Monday, October 15, 2012, 13:41

भारतीय नौदलातील चेतक हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. त्यात तिघांचा दुर्दैवी मुत्यू झाला आहे. त्यात दोन वैमानिकांचा समावेश आहे.

'जिस्म-'३ बनणार '३ डी'मध्ये

Last Updated: Sunday, July 22, 2012, 19:48

चक्क पॉर्न स्टारला घेऊन शूट केलेला हा पहिला बॉलिवूड सिनेमा असल्यावर याच्यापुढे काय? असा प्रश्न लोकांना पडला... त्यावर दिग्दर्शिका पूजा भट्टनेच उत्तर दिलं आहे.

मुंबईतील वऱ्हाडाच्या बसला अपघात, २७ ठार

Last Updated: Monday, May 28, 2012, 12:39

मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर वऱ्हाडाच्या बसला झालेल्या अपघातात २३ जण ठार तर १५ जण जखमी झाले आहेत. खालापूर जवळ मध्यरात्री दोनच्या सुमारास लग्नाच्या वऱ्हाड असलेल्या दोन मिनी बसना मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक दिली.

वसईत भीषण अपघात, ३ ठार

Last Updated: Sunday, May 27, 2012, 12:08

वसईत ट्रक आणि इंडिका कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात ३ जण जागीच ठार झाले असून १ जण गंभीर जखमी झाला आहे. वसईच्या सातिवली खिंडीत बाफणा परिसरातून येणाऱ्या ट्रकचा टायर फुटला.

पोलिसांमुळेच तिघांना दगडाने ठेचून मारलं

Last Updated: Thursday, May 10, 2012, 12:48

नागपूर शहरातल्या भारतनगरमध्ये काल दगडानं ठेचून संतप्त जमावानं तिघा जणांचा जीव घेतला होता. यासंबंधी धक्कादायक खुलासा स्थानिकांनी केला आहे.

आंगणेवाडी भक्तांवर घाला, २ ठार

Last Updated: Saturday, February 25, 2012, 09:20

संगमेश्वर येथे झालेल्या अपघातात ३ महिला ठार तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची स्थिती गंभीर असून त्यांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त कुटुंब मुंबईतील राहणारं आहे.

कल्याण: अपघातात ३ ठार

Last Updated: Saturday, December 10, 2011, 07:30

आज पहाटे कल्याण मध्ये झालेल्या एका भीषण अपघातात तीन जण ठार झाले. तर पाच जण जखमी झाले. मृतांमध्ये मायलेक आणि एका पंधरा वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. मद्यधुंद कारचालकाच्या चुकीमुळं तिघांना प्राणाला मुकावं लागलं.