Last Updated: Tuesday, July 24, 2012, 16:53
www.24taas.com, मुंबई लैला खान या अभिनेत्रीच्या खूनाचं गूढ पूर्णतः उकललंही नसलं, तरी बॉलिवूडमध्ये या घटनेवर सिनेमा बनवण्याची तयारी सुरू झाली आहे. लैला खान आणि दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांना घेऊन काढलेल्या ‘वफा’ या सिनेमाचे दिग्दर्शक राकेश सावंतच या मर्डर मिस्ट्रीवर सिनेमा बनवणार आहेत. य़ा सिनेमाचं शीर्षक ‘एक थी लैला’ असं आहे.
या सिनेमात लैला खानची भूमिका वीणा मलिक हिने करावी अशी सावंत यांची इच्छा आहे. मात्र, वीणा मलिक सध्या दुबईत असल्यामुळे तिच्याशी या संदर्भात बोलणी होऊ शकलेली नाहीत. ती भारतात येताच या सिनेमाबद्दल सावंत तिच्याशी चर्चा करणार आहेत. या शिवाय लैलाची बहिण आफरीन हिच्या भूमिकेसाठी राखी सावंतला निवडलं आहे.
याशिवाय लैला खान मर्डर मिस्ट्रीमधील महत्वपूर्ण ठरल्ली लैला खानची आई सलीना हिची भूमिका पाकिस्तानी गायिका-अभिनेत्री सलमा आगा यांनी करावी असा सावंत यांचा आग्रह आहे. त्यांच्याइतकं या व्यक्तिरेखेत कुणीच चपखल बसू शकत नाही, असा सावंत यांचा दावा आहे.
First Published: Tuesday, July 24, 2012, 16:53