Last Updated: Sunday, December 18, 2011, 15:35
झी २४ तास वेब टीम, मुंबईशाहिद कपूर आणि करिना कपूर हे परत एकत्र येण्याची शक्यता आहे असं जर आम्ही तुम्हाला सांगितलं तर सैफचं काय होणार असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पण प्रत्यक्षात ती शक्यता फारच धूसर आहे पण सिनेमा एकत्र काम करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मिलन लुथ्रियाच्या वन्स अपॉन ए टाईमच्या सिकवेल मध्ये शाहिद आणि करिना एकत्र काम करण्याची शक्यता आहे. दाऊद इब्राहिमच्या व्यक्तिरेखेवर आधारीत भूमिका अक्षय साकारणार आहे तर दुसऱ्या लीड रोलसाठी शाहिदला ऑफर देण्यात आली आहे.
बेबोलाही विचारण्यात आली आहे. अजून तरी करिनाने मिलन लुथ्रिया आणि एकता कपूरला होकार कळवलेला नाही. अक्षयचा मोठा चाहता वर्ग आहे तर आता मिलननेही एक संवेदनशील दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केलं आहे. तसंच एकता कपूर मार्केटिंग आणि प्रमोशनच्या बाबतीत कोणतीच कसर ठेवणार नाही. त्यामुळे मेगा हिट ठरलेल्या वन्स अपॉन ए टाईम इन मुंबईच्या सिकवेलही बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करुन दाखवेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. करिनाने ही भूमिका स्वीकारली तर तिच्या कारकिर्दीतली ही महत्वाची फिल्म ठरु शकते. आता शाहिदने ऑफर स्वीकारल्यानंतर
करिना होकार देते का ते पाहायचं.
First Published: Sunday, December 18, 2011, 15:35