करिनाचा शाहरूखला झटका - Marathi News 24taas.com

करिनाचा शाहरूखला झटका

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
२०११ मध्ये बॉडिगार्ड सिनेमा हिट ठरला तर रा-वन फ्लॉप आणि आता हे करिना कपूरनेही जाहीरपणे मान्य केलंय. एका अवॉर्ड फंक्शनमध्ये करिना कपूरने बॉडीगार्डला हिट सिनेमा ठरवून शाहरुख खानला एकप्रकारे झटका दिलाय.
 
२०११मध्ये करिना कपूरचे बॉडीगार्ड आणि रा-वन असे दोन फिल्म रिलीज झाले. बॉडीगार्डमध्ये करिना सलमान खानसह झळकली तर रा-वन मध्ये शाहरुख खान बरोबर आहे. शाहरुख आणि सलमान यांच्यातलं स्टार वॉर जगजाहिर आहे त्यामुळे या दोघांसह फिल्म करताना करीनावर दडपण तर होतंच. या दोघांपैकी कोणाचे गोडवे गायचे हा करिना समोर यक्ष प्रश्न होता. मात्र सिनेमा रिलीज होई पर्यंत करिनाने दोघांनाचे गुणगान गायले.
 
मात्र य़ा दोन्ही फिल्मच्या रिलीजनंतर करीनाने आता आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केलीय. या दोन्ही फिल्मपैकी बॉडीगार्डने बॉक्सऑफिसवर घवघवीत यश मिळवलं तर रा-वन दणाणून आपटला. मात्र २०११  मधला हिट सिनेमा कोणता यावर करीनाने बिनदिक्कत बॉडीगार्डचं नावं घेतलं आणि एकप्रकारे शाहरुखला झटकाच दिला एकूणच बॉलिवूडने नेहमी उगवत्या सूर्याला नमस्कार केलाय त्यामुळे ज्याची फिल्म चालली तो हिट आणि नाही चालली त्याचा डब्बा गुल असंच करिना आपल्या
विधानवरुन स्पष्ट करतेय.

First Published: Tuesday, December 20, 2011, 12:09


comments powered by Disqus