टायगर विरुद्ध डॉन - Marathi News 24taas.com

टायगर विरुद्ध डॉन

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
शाहरुख आणि सलमानमधलं स्टारवॉर काही नवं नाही आणि आता तर हे स्टार वॉर वाढत जातंय.असं म्हणतात 'सलमान की दोस्ती भी देखने लायक और दुश्मनी भी' आणि सलमानची दुश्मनी म्हटलं की शाहरुख खानचं नाव नकळतपणे समोर येतं आणि हे स्टारवॉर संपण्याची काहीच चिन्ह दिसत नाहीत. उलट दिवसेंदिवस ती वाढताना दिसते आहे.
 
सलमानचा आगामी 'एक था टायगर' सिनेमा 3D मध्ये येणार होता मात्र सलमान आधीच शाहरुखचा 'रा-वन' आणि 'डॉन 2' सिनेमा 3D मध्ये येऊन गेला. त्यामुळे आता सलमान खानने आपला निर्णय बदललाय.
 
शाहरुखच्या पावलावर मी का पाऊल ठेऊ, असा पवित्रा सलमानने घेतलाय त्यामुळे सलमानने एक था टायगर 3D स्वरुपात आणण्याचा निर्णय आता बदललाय. एकूणच हे स्टार वॉर असंच पुढे सुरू राहणार अशीच चिन्हं सध्या दिसतायत

First Published: Thursday, December 29, 2011, 11:04


comments powered by Disqus