आयटम गर्लचा टॅग राखीसाठीच 'राखी'व! - Marathi News 24taas.com

आयटम गर्लचा टॅग राखीसाठीच 'राखी'व!


झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
राखी सावंत म्हणजे बॉलिवूडची पहिली आयटम गर्ल. मात्र आता बॉलिवूडच्या आघाडीच्या तारकांनी राखीची जागा घेतल्यान सध्या राखी चांगलीच गुश्शात आहे.
 
बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा 'आयटम गर्ल'चा टॅग लागला तो राखी सावंतला. राखीच्या बोल्ड अंदाजामुळे सिनेमात राखीच्या गाण्याचा तडका हा तर हवाच असं जणू समीकरणच झालं. आणि म्हणूनंच राखी रातोरात बॉलिवूडची एकमेव आयटम गर्ल झाली. मात्र, बॉलिवूडमध्ये आलेल्या नव्या ट्रेंडमुळे सर्व आघाडीच्या नायिकांनीच आयटमवर थिरकाला सुरुवात केली. त्यामुळे राखी सावंत नामक आयटम गर्लची चांगलीच छुट्टी झाली आणि म्हणूनच या सगळ्या आयटम गर्ल्सवर राखी चांगलीच संतापलीय.
सध्या गाजत असेलल्या चिकनी चमेलीचा विषय काढताच राखीचा नूर चांगलाच पालटला. कतरिना आपलीच कॉपी करत असल्याची मुक्ता फळं राखीनं उधळलीत. इतकंच नाही तर कितीही आले कितीही गेले तरी खरी 'आयटम क्वीन' मीच आहे आणि मीच राहणार असंच राखीचं म्हणणं आहे. मात्र या वर्षी तरी कतरिना, करीना, मल्लिका या आघाडीच्या तारकांनीच राखीची छुट्टी केलेली दिसतेय.

First Published: Sunday, January 1, 2012, 08:58


comments powered by Disqus