Last Updated: Wednesday, February 22, 2012, 11:55
www.24taas.com, मुंबई 
नो क्लिक्स प्लीज. असं म्हणतोय अभिषेक बच्चन. तीन महिने झाले तरी बेटी बीचा एकही फोटो रिलीज करण्यात आला नाही. कारण प्रसिद्धीमाध्यमांपासून बेटी बीला दूर ठेवायचं असाच निर्णय अभिषेक-ऐश्वर्याने घेतला आहे. असं अभिषेक का म्हणतो आहे.
अभिषेक बच्चनला आपल्या मुलीला द्यायचंय एक ग्रेट गिफ्ट. आणि ती म्हणजे स्वातंत्र्य. हे आम्ही नाही तो स्वत:च म्हणला आहे. नुकतंच एका कार्यक्रमात त्याने हे स्पष्ट केलं. ज्युनियर बीला आपल्या मुलीला द्यायचंय स्वातंत्र्य. आणि म्हणूनच कुठल्याही पब्लिसिटीपासून बच्चन कुटुंबियांनी बाळाला दूर ठेवलं आहे. अभिषेक-ऐश्वर्याच्या मुलीचा एकही फोटो अजून रिलीज करण्यात आला नाही.
प्रसिद्धी माध्यमांपासून सध्या तरी आपल्या मुलीला पूर्णपणे दूर ठेवण्याचा निर्णय बच्चन कुटुंबियांनी घेतला आहे आणि हेच अभिषेकने पुन्हा ठामपणे सांगितलं. त्यामुळे सध्या तरी या बेबी बीचं दर्शन होणं कठिणच दिसतं आहे.
First Published: Wednesday, February 22, 2012, 11:55