मनसेचा गुन्हेगारी स्वातंत्र्यसूर्य(वंशी)!

Last Updated: Monday, August 19, 2013, 18:47

पुणे महापालिकेनं चक्क चोर, गुन्हेगारांचा सत्कार केलाय. तोही स्वातंत्र्य दिनी.... चोरी, गुन्हेगारीचे आरोप असलेल्या व्यक्तीला महापालिकेनं पुण्याच्या लौकिकात भर घालणारी नामवंत व्यक्ती म्हणून गौरवलंय. गुन्हेगारांच्या या सत्कारासाठी शिफारस केली होती ती, मनसेच्या नगरसेवकांनी...

भगत सिंह, राजगुरू, सुखदेव यांना ‘शहीद’ सन्मान नाही?

Last Updated: Saturday, August 17, 2013, 21:09

देशाच्या स्वतंत्र्य लढ्यात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना सरकारी दस्तऐवजांमध्ये ‘शहीद’ दर्जा प्रात्प नाही. हा धक्कादायक खुलासा माहितीच्या अधिकारात समोर आला आहे.

नरेंद्र मोदींची टीका योग्य नाही - अडवाणी

Last Updated: Friday, August 16, 2013, 09:36

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर केलेली टीका योग्यवेळी नव्हती. स्वातंत्र्यदिनी त्यांनी टीका करणे योग्य नाही, अशी नाराजी भाजपचे ज्येष्ठ नेत लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केली. मोदींना हा घरचा आहेर असल्याचे म्हटले जात आहे.

एका सैनिकाच्या लग्नाची गोष्ट

Last Updated: Thursday, August 15, 2013, 21:10

लग्न करायचं झालं तर पंचांग काढा, मुहूर्त शोधा, अशी लगीनघाई सुरू होते... पण ही झाली सर्वसामान्यांच्या लग्नाची गोष्ट... नवरदेव हा देशासाठी सीमेवर लढणारा सैनिक असेल तर... त्याच्या आयुष्यात 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनापेक्षा आणखी चांगला मुहूर्त असूच शकत नाही...

मणिपूरमध्ये स्वातंत्र्यदिनी स्फोट

Last Updated: Thursday, August 15, 2013, 15:52

मणिपूरमधील रायफल्स परेडच्या मैदानापासून ४०० मीटर अंतरावर आज स्वातंत्र्य दिन साजरा करण्याच्या काही मिनिटे अगोदरच एक प्रचंड मोठा स्फोट झाला. या स्फोटात कोणालाही इजा पोहचली नाही.

स्वातंत्र्यदिन : ब्रिटिश पंतप्रधानांच्या भारतीयांना शुभेच्छा

Last Updated: Thursday, August 15, 2013, 12:32

देशात ठिकठिकाणी भारताचा ६७ व्या स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जातोय... एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातायत. भारतीयांना याच दिवसाच्या शुभेच्छा ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन यांनीही दिल्यात.

मुंबईत ‘हाय अलर्ट’ जारी!

Last Updated: Thursday, August 15, 2013, 10:49

स्वातंत्र्यदिन आणि येऊ घातलेल्या सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी केलाय. पोलिसांनी शहरात सुरक्षाव्यवस्था कडक केलीय.

देशात सास-बहू-दामादचा खेळ : नरेंद्र मोदी

Last Updated: Thursday, August 15, 2013, 10:47

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. देशात सास-बहू-दामाद असं चित्र दिसत आहे. सिमेवर लढणाऱ्या जवानांना लाल किल्ल्यावरून धीर देण्यात आलेला नाही, येथेच त्यांनी जनतेचा विश्वास गमावलाय, अशी टीका मोदी यांनी भूजमधील महाविद्यालयातील भाषणात केली.

'दिल्ली, गुजरातचा मुकाबला होऊन जाऊ द्या...'

Last Updated: Thursday, August 15, 2013, 10:25

गुजरातच्या भूजमध्ये मुख्यमंत्री नरेंद्र मोदी भाषणासाठी उभे आहेत. स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून भाषण करतील तेव्हा त्यांच्या आणि माझ्या भुज इथल्या भाषणाची नक्कीच तुलना होईल, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यामुळे त्यांच्या भाषणाची उत्सुकता वाढलीय...

संयमाचा अंत पाहू नका, पाकला राष्ट्रपतींचा इशारा

Last Updated: Thursday, August 15, 2013, 08:45

पाकिस्तानकडून भारताला त्रास देने सुरू आहे. सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. यावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या भाषणात दम भरला आहे. संयमालाही काही मर्यादा असतात. आमच्या संयमाचा कुणीही अंत पाहू नये, असा स्पष्ट इशारा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पाकिस्तानला दिला आहे.

लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण

Last Updated: Thursday, August 15, 2013, 08:54

आज भारताचा स्वातंत्र्यदिन... देशाचा ६७ वा स्वातंत्र्यदिन लाल किल्ल्यावर होतोय साजरा झाला. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहन झालं यानंतर त्यांनी देशाला संबोधित केलं.

गुगलचं भारतीयांना आव्हान...

Last Updated: Wednesday, August 14, 2013, 12:09

गुगलनं चक्क भारतीयांना एक आव्हानच दिलंय. हे आव्हान पेलण्याची जबाबदारी सोपवलीय भारतात कोणत्याही ठिकाणी कार्यरत असणाऱ्या `ना नफा` तत्वावर चालणाऱ्या संस्थांकडे...

पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर केलं ध्वजारोहण

Last Updated: Wednesday, August 15, 2012, 08:07

आज स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान म्हणून ध्वजारोहण करण्याची ही नववी वेळ आहे. यानंतर पंतप्रधानांनी देशाला संबोधित केलं.

भ्रष्‍टाचाराने देश पोखरलाय - राष्ट्रपती मुखर्जी

Last Updated: Tuesday, August 14, 2012, 22:18

www.24taas.com, नवी दिल्ली देशाला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. ती काढून टाकली पाहिजे. यासाठी तरूणांनी पुढाकार घेतला पाहिजे. देशाच्या प्रगतीसाठी तरुणांनी पुढाकार घ्यायला हवा, असे नवनिर्वाचित राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ६६ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंधेला दिलेल्या अभिभाषणात सांगितले. भ्रष्‍टाचाराने देशाला पोखरले आहे. त्यामुळे देशाची मोठी हानी होत आहे. भ्रष्टाचारासह दहशतवाद, गरीबी आणि जनतेच्या आरोग्य विषयक समस्येला प्राधान्य देऊन त्या आधी सोडविल्या पाहिजेत, असे राष्ट्रपती म्हणालेत. भ्रष्टाचार देशाच्या प्रगतीला मारक ठरत आहे. त्यातच भ्रष्टाचाराविरोधात जनतेच्या भडकलेल्या भावनांचा मी आदर करतो, मात्र त्यावर प्रभावीपणे अंकुश ठेवला जात नसल्याचे मुखर्जींनी मान्य केले. देशातील शासकीय संस्था भारतीय संविधानाचे मजबूत स्तंभ आहे. त्या उद्‍वस्त करता येणार नाही. परंतु, त्यात सुधारणा करता येऊ शकतात, असेही मुखर्जींनी म्हटले. त्यामुळे अण्णा हजारे आणि बाबा रामदेव यांना अप्रत्यक्ष राष्ट्रपतींनी टोला लगावला. जनतेने न्यायप्रक्रीयेवर विश्वास ठेवला पाहिजे. जनतेला राज व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. परंतु कायदा तयार करण्याचा अधिकार संविधानाला आहे. आणि त्याला न्याय देण्याचा अधिकार न्याय प्रक्रियेला आहे. आपण हा अधिकार न्याय संस्थांकडून हिरावून घेऊ शकत नाही, असेही अण्णा आणि बाबांना सुनावताना सांगितले की, जर अधिकारी हुकूमशाहा बनले तर मात्र लोकशाहीचे मोठे नुकसान होत असते. शालिनता आणि सहिष्णुता लोकशाहीचा मूळ आधार आहे.

१५ ऑगस्टला पुन्हा `सत्यमेव जयते`

Last Updated: Sunday, August 12, 2012, 20:02

आमिर खानने ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाद्वारे छोट्य पडद्यावर एंट्री केली होती. या कार्यक्रमाला तुफान प्रतिसाद मिळाला. हा कर्यक्रम १५ ऑगस्टला पुन्हा पाहायला मिळणार आहे.

'बेटी बी'ला स्वातंत्र्य द्यायचं आहे - बच्चन

Last Updated: Wednesday, February 22, 2012, 11:55

नो क्लिक्स प्लीज. असं म्हणतोय अभिषेक बच्चन. तीन महिने झाले तरी बेटी बीचा एकही फोटो रिलीज करण्यात आला नाही. कारण प्रसिद्धीमाध्यमांपासून बेटी बीला दूर ठेवायचं असाच निर्णय अभिषेक-ऐश्वर्याने घेतला आहे.

गोवा मुक्ती सुवर्णमहोत्सव साजरा

Last Updated: Monday, December 19, 2011, 05:49

गोवा मुक्ती सुवर्णमहोत्सवाच्या निमित्त गोवा सरकारच्या वतीनं कृतज्ञता म्हणून ऑपरेशन विजयमध्ये सहभागी झालेल्या सैनिकांचा सन्मान करण्यात आला. पन्नास वर्षापूर्वी पोर्तूगीजांची राजवट उलथवून लावण्यात नौदल, वायूदल आणि सेनादलातील सैनिकांनी महत्वाची कामगिरी बजावली होती.