'एजंट विनोद'च्या रिलीज आधीच सिक्वेल - Marathi News 24taas.com

'एजंट विनोद'च्या रिलीज आधीच सिक्वेल

www,24taas.com, मुंबई
 
सैफ अली खानचा ‘एजंट विनोद’ सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. मात्र या सिनेमाच्या रिलीजआधीच सैफने या सिनेमाचा सिक्वेल आणण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा छोटे नवाब सैफ अली खान आता सिल्व्हर स्क्रीनवर बॉलिवूडचा जेम्स बॉन्ड म्हणून आपल्या समोर येणार आहे. एजंट विनोदमधील सैफचा स्टायलिश अंदाज जेम्स बॉन्डचीच आठवण करून देतो. सैफ अली खानचा हा खूपच महत्वकांक्षी सिनेमा आहे. या सिनेमासाठी सैफने खूपच मेहनत घेतली आहे.
 
ऍक्शन थ्रीलर असलेल्या या सिनेमात  सैफसह करीना कपूरही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे सैफला या सिनेमाची खूपच उत्सुकता आहे. या सिनेमाबाबत सैफ खूप आशावादी आहे. तसंच करीनाने या सिनेमात मुजऱ्याचीही झलक दाखवली आहे. करीना प्रत्येक सिनेमातून प्रेक्षकांना सरप्राईज करत आली आहे. ‘एजंट विनोद’मध्येही करीनाने आपल्या मुजऱ्याची अदा दाखवून प्रेक्षकांना घायाळ केलंय. एकूणच करीनाचा मुजरा, सैफचा स्टायलिश अंदाज, ऍक्शन-थ्रील आणि रोमान्सचा मिलाफ हे सारं काही प्रेक्षकांना भावेल असा विश्वास सैफला आहे त्यामुळे हा सिनेमाही हिट होईल असंही सैफला वाटतंय.
 
मात्र यशाची ही गणितं सैफ इथंवरच बांधून थांबलेला नाही, तर हा सिनेमा हिट ठरला तर या सिनेमाचा सिक्वेल आणण्याचीही सैफने इच्छा व्यक्त केली आहे. एजंट विनोद अजून रिलीजही झाला नाही आणि रिलीज आधीच सैफ या सिनेमाचा सिक्वेल आणण्याच्या तयारीला लागला आहे. सिनेमाच्या रिलीज आधीच सिक्वेलचा विचार कऱणं तसं धाडसीच मानावं लागेल. शेवटी हा बॉलिवूडचा ‘जेम्स बॉन्ड’ आहे, त्यामुळे अशा अनपेक्षित गोष्टीच तो करणार... नाही का?
 
 
 
 
 

First Published: Saturday, March 10, 2012, 15:26


comments powered by Disqus