Last Updated: Wednesday, April 11, 2012, 10:19
www.24taas.com, मुंबई कमाल राशिद खान ऊर्फ केआरके हा आता असिनच्या प्रेमात पडलाय. आणि आपलं हे असिनप्रेम त्यानं त्याच्या खास पद्धतीने ट्विटरवर जगजाहिर केलं आहे. आता असिन केआरकेला भाव देणं कठीणच. पण, तरीही केआरके तिच्या बरोबर प्रेमालाप करतो... पण स्वप्नात! केआरके आपल्या असिनवरील प्रेमाची स्पर्धा सलमान खानशी करतोय. दोघांच्या असिनवरील प्रेमामधील फरक केआरकेने ट्विटरवर सांगितला आहे.
वाट्टेल तसं बडबडणाऱ्या केआरकेने यापूर्वी सचिनची सलमानशी तुलना करून सलमान कसा ग्रेट आहे, हे सांगितलं होतं. आता सलमानची तुलना स्वतःशीच करत असिनबद्दल वाट्टेल ते बरळला आहे. सलमानने असिनला केलेल्या ‘किस’मध्ये आणि मी असिनला करत असलेल्या ‘किस’मध्ये काय फरक आहे, असा प्रश्न विचारत केआरकेने स्वतःच उत्तर दिलं आहे. सलमान खान असिनला प्रत्यक्षात किस करतो.. आणि कमाल राशिद खान स्वप्नात! असं कमालने ट्विटरवर लिहीलं आहे.
आता रात्री स्वप्नात आपल्या ड्रिमगर्लसोबत आपण काय काय करतो, याची वर्णनं कमाल रोज ट्विटरवर जाहीर करू लागला, तर असिन बिचारी काय करणार? आणि सलमानचं यावर काय मत आहे?
First Published: Wednesday, April 11, 2012, 10:19