सलमानसाठी पैशापेक्षा आमीर महत्त्वाचा - Marathi News 24taas.com

सलमानसाठी पैशापेक्षा आमीर महत्त्वाचा

www.24taas.com, मुंबई
 
सलमान खान आणि आमीर खान यांनी खरंतर एकत्र काम केलंय, ते फक्त एकाच सिनेमात. 'अंदाज अपना अपना' येऊनही बरीच वर्षं झाली. पण, तरीही त्यांची एकमेकांशी मैत्री अजूनही तितकीच घट्ट आहे. सलमान आमीरमधील मैत्रीबद्दल नेहमीच बोललं जातं. पण त्यांच्या मैत्रीचा आणखी एक किस्सा समोर आला आहे.
 
आमीर खान ‘सत्यमेव जयते’ या शोमधून टीव्हीवर पदर्पण करत आहे. या शोबद्दल बरीच चर्चा चालू आहे. प्रेक्षकांनाही या कार्यक्रमाबद्दल कमालीची उत्सुकता आहे. हा कार्यक्रम रविवारी सुट्टीच्या दिवशी सकाळी प्रसारीत होणार आहे आणि तोही ८ चँनेल्सवर. त्यामुळे या शोचा इतर वाहिन्यांनी धसका घेतला आहे.
 
मोठ्या पडद्यावर आणि टीव्हीवरही तितकेच लोकप्रिय असणारे कलाकार म्हणजे अमिताभ बच्चन आणि सलमान खान. तेव्हा आमिरच्या शोचा TRP कमी करण्यासाठी एक वाहिनी सलमान खानकडे गेली. तिने करोडो रुपये देत आमीरच्या शो च्या वेळेत दुसऱ्या वाहिनीवर सलमानचा शो सुरू करण्याची सलमानला विनंती केली. मात्र “आमीर जर नवा चांगला शो आणत आहे, तर त्याच्याशी मी स्पर्धा करणार नाही” असं सांगत सलमानने ही ऑफर धुडकाऊन लावली. सलमानने बऱ्याचजणांना आत्तापर्यंत वेळोवेळी मदत केली आहे, पण आपला स्पर्धक असणाऱ्या आमीरला सुद्धा अशी मदत  करणं, हे फक्त सलमानच करू शकतो.
 

First Published: Monday, April 23, 2012, 21:49


comments powered by Disqus