आता भारत सरकारही सुरू करणार `सत्यमेव जयते`!

Last Updated: Sunday, April 6, 2014, 19:48

एकीकडे अभिनेता आमिर खानचा शो `सत्यमेव जयते` प्रसिद्ध होत असतांना दुसरीकडे केंद्र सरकार आपल्या संदेशाचा सन्मान होण्यासाठी प्रयत्न करतोय.

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिरनं केलं मरणोत्तर अवयवदान

Last Updated: Monday, March 31, 2014, 14:01

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा चित्रपटांव्यतिरिक्त सामाजिक कार्यातही तितकाच परफेक्ट असतो. नुकताच आमिरनं मरणोत्तर अवयवदान केलंय. शनिवारी केईएम रुग्णालयात आयोजित एका कार्यक्रमात आमिर हा निर्णय घेतला. आमिर खान सध्या त्याच्या `सत्यमेव जयते` या कार्यक्रमाद्वारे समाजात एक नवा बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित त्यातलंच त्याचं हे एक पाऊल असेल.

आमिर खान `सत्यमेव जयते`मुळे अडचणीत

Last Updated: Tuesday, March 4, 2014, 15:54

अभिनेता आमीर खान त्याच्या `सत्यमेव जयते`मुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाच्या दुसर्‍या सिझनमधील पहिल्याच भागात त्याच्याकडून न्यायप्रविष्ट खटल्याबाबत भाष्य केल्याने न्यायालयाचा अवमान केल्याचे संकट येऊ शकते. तसे कायदे तज्ज्ञांचे मत आहे.

अमिरच्या `सत्यमेव जयते`ला सलमान देणार टक्कर

Last Updated: Wednesday, January 8, 2014, 16:15

अभिनेता सलमान खान आणि अमिर खान यांची दोस्ती सर्वांनाच ठाऊक आहे. दोघेही मोठ्या पडद्यावर आपली जादू दाखवत असताना त्यांनी छोट्या पडद्यावर आपला करिष्मा दाखवला आहे. आता सल्लू अमिरला टक्कर देण्याच्या तयारीत आहे. लवकरच सलमानचा सामाजिक विषयावर टीव्ही शो होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सलमान नविन भूमिकेत दिसेल.

आमिर खानचा अमेरिकेत सन्मान

Last Updated: Wednesday, October 30, 2013, 23:37

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला अमेरिकेत सन्मानित करण्यात आलयं.. अमेरिकेचा प्रतिष्ठित इनॉगरल अमेरिका अब्रॉड मीडिया एवॉर्ड आमिरच्या सत्यमेव जयते शोला मिळालाय..

'थोडी सी शराब'... आमीर सापडला वादात

Last Updated: Thursday, July 12, 2012, 11:30

आमीर खान प्रोडक्शननिर्मित सत्यमेव जयते हा पुन्हा एकदा वादात सापडलाय. ‘ज्यांना दारु प्यायची असेल त्यांनी थोडी थोडी प्या’ हे आमीरचं वक्तव्यं आता चर्चेचा विषय ठरलंय.

जावेद अख्तर होते पक्के दारुडे

Last Updated: Sunday, July 1, 2012, 18:57

मी १९ व्या वर्षापासूनच म्हणजे मी ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षापासून दारु प्यायला लागलो होतो. हळू -हळू ही सवय इतकी होत गेली की मी रोज एक बाटलीची दारु संपवू लागलो होतो, असे स्वतः बॉलीवूडमधील प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी कबुली दिली. तब्बल २६-२७ वर्षापर्यंत पक्का दारुडा होतो, असेही त्यांनी आमिर खानच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमात मान्य केले.

स्त्रीभ्रूण हत्या: आमिर जाणार राज्यसभेत

Last Updated: Wednesday, June 20, 2012, 15:02

आमिर खान प्रोडक्शननिर्मित ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी अभिनेता आमिर खाननं स्त्री भ्रूण हत्येच्या गंभीर विषय मोठ्या सामंजस्यानं हाताळला होता. हाच विषय राज्यसभेत मांडण्यासाठी आमिरला आमंत्रण देण्यात आलंय आणि आमिरनं ते स्विकारलंही आहे.

आमिरमुळे चिमुरडी पळून लग्न करणार!

Last Updated: Wednesday, June 13, 2012, 18:18

बॉलिवुड स्टार आमिर खानचा शो सत्यमेव जयते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या शोमध्ये उपस्थित केलेल्या मुद्द्यामुळे आमिर खान रोज एका नव्या अडचणीत सापडत आहे. सुरूवातीला डॉक्टरांनी आमिरला माफी मागण्यास सांगितले होते. आता हरिणाची खाप पंचायत त्याच्यामागे पडली आहे.

डॉक्टरांची माफी मागणार नाही – आमिर खान

Last Updated: Thursday, June 7, 2012, 18:40

सत्यमेव जयते या कार्यक्रमातून जनजागृती करणारा बॉलिवुडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमीर खानने डॉक्टरांची माफी मागण्यास इन्कार केला आहे. शोमधून डॉक्टरांची तसेच त्याच्या पेशाची बदनामी केली असल्याचा आरोप करत डॉक्टरांनी आमिरकडे माफीची मागणी केली होती.

आमिर खान करणार विनामोबदला जनजागृती

Last Updated: Wednesday, June 6, 2012, 07:42

टीव्ही पडद्यावर आपल्या सत्यमेव जयते या शोद्वारे सामाजिक मुद्द्यांना ऐरणीवर आणणारा अभिनेता आमिर खान आता लवकरच एका प्रचार अभियानाद्वारे कुपोषणच्या समस्येवर जनतेला जागरुक करायला निघणार आहे.

'स्त्री भ्रूण हत्ये'च्या प्रश्नावर आमिर रस्त्यावर?

Last Updated: Wednesday, May 30, 2012, 11:14

मुलींचं घटत जाणारं प्रमाण लक्षात घेऊन बिहार सरकारनं ‘बिटीया बचाओ आंदोलन’ सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. आणि यासाठी त्यांना मदत हवीय अभिनेता आमीर खानची...

'...तर आमिरचं काय चुकलं?'

Last Updated: Tuesday, May 15, 2012, 16:54

‘आमिरनं त्याची सामाजिक मुद्दे उचलून धरण्यासाठी वापरली तर त्यात वाईट काय आहे’, असा प्रश्न टीकाकारांना विचारत चित्रपट निर्माता शेखर कपूरनं आमिरची पाठराखण केलीय.

संवेदनशील मुद्द्यातून आमिर कमवतो पैसा!

Last Updated: Monday, May 14, 2012, 18:11

आमिर खानने 'सत्‍यमेव जयते' या शो मधून स्‍त्री भ्रृणहत्‍या सारखा संवेदनशील विषय हाताळून राजस्‍थानची बदनामी केली असून असे भावनिक मुद्द्यांना मनोरंजनाचे साधन बनविल्याची जळजळीत टीका राजस्थानचे आरोग्‍य राज्‍यमंत्री डॉ.राजकुमार शर्मा यांनी केली आहे.

राखी सावंत म्हणते, आमिर खान चोरटा

Last Updated: Wednesday, May 9, 2012, 18:19

‘सत्यमेव जयते’ हा कार्यक्रम जेव्हापासून सुरू झालाय, तेव्हापासूनच तो वेगवेगळ्या कारणांसाठी सतत चर्चेत राहिलाय. आता या चर्चेमध्ये राखी सावंतही सहभागी होतेय. आयटम गर्ल राखीच्या म्हणण्यानुसार ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाची संकल्पना ही तिची आहे आणि आमीर खाननं ही संकल्पना चोरली आहे.

आमिरच्या प्रसिद्धीने तसलिमा नसरीनचा जळफळाट

Last Updated: Tuesday, May 8, 2012, 17:36

स्त्रीवादी आणि सामाजिक कार्यकर्त्या तसलिमा नसरीन यांना आमीर खानच्या 'सत्यमेव जयते'मुळे प्रचंड धक्का बसला आहे. आमीर खानने मांडलेल्या समाजातील मुद्यांवर प्रेक्षकांनी ज्या प्रमाणावर प्रतिसाद दिला, तो पाहून तसलिमा नसरीन हैराण झाल्या आहेत.

सलमानसाठी पैशापेक्षा आमीर महत्त्वाचा

Last Updated: Monday, April 23, 2012, 21:49

सलमान खान आणि आमीर खान यांनी खरंतर एकत्र काम केलंय, ते फक्त एकाच सिनेमात. 'अंदाज अपना अपना' येऊनही बरीच वर्षं झाली. पण, तरीही त्यांची एकमेकांशी मैत्री अजूनही तितकीच घट्ट आहे.