Last Updated: Friday, May 11, 2012, 23:07
www.24taas.com, मुंबई या विकेण्डला बहूचर्चित अजिंठा, यश राज बॅनरचा इशकजादे आणि भट्ट कॅम्पचा डेंजरस इष्क हे चित्रपट भेटीला आलेत. अजिंठा या सतत चर्चेत असमा-या सिनेमाला प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिलीय. तर यशराजच्या प्रेमकहाणीचा फर्म्युलाही पुन्हा हिट ठरलाय.
पारो आणि रॉबर्ट या दोन भिन्न संस्कृतीतल्या जीवांची प्रेमकाहाणी म्हणजे अजिंठा... सिनेमाचा वाद...कोर्टाचा निर्णय यामुळे सतत चर्चेत असणारा अजिंठा पडद्यावर झळकला.... आणि प्रेक्षकांची उत्सुकता ही शिगेला पोहोचली.. नितीन चंद्रकांत देसाईंचे भव्य दिव्य सेट्स...त्यांचं दिग्दर्शन.. सोनाली कुलकर्णीनं रंगवलेली पारो हे सारं काही पाहण्यासाठी प्रेक्षकांनी सिनेमागृहात गर्दी केली...या सिनेमाला 70 ते 80 टक्के ओपनिंग पहिल्या दिवशी मिळालं.
अर्थात रिलीजच्या तोंडावर रंगलेल्या सिनेमाच्या वादामुळे काही प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आणि त्य़ानी सिनेमागृहाची वाट धरली. विशेष म्हणजे वादात सापडेलला अजिंठा सिनेमा निर्भयतेनं प्रेक्षकांनी पहावा यासाठी खास नितीन देसाईच्या आग्रहास्तव थिएटरमध्ये सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आलीय.
तर इष्कजादे या अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा यांच्या हटके प्रेमकहाणीला पहिल्या दिवशी हाऊसफुल्ल गर्दी झाली. डेंजरस इष्क या करिश्मा कपूरच्या कमबॅक सिनेमाकडे मात्र पहिल्या दिवशी तरी प्रेक्षकांनी पाठ फिरवली. तेव्हा या आठवड्यात मराठीतली एक अव्यक्त प्रेम कहाणी किंवा इष्कजादे सारखी बिनधास्त लव्ह स्टोरी अशा दोन लव्ह स्टोरीजचा ऑप्शन प्रेक्षकांकडे आहे.
First Published: Friday, May 11, 2012, 23:07