Last Updated: Tuesday, May 21, 2013, 16:10
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईपाकिस्तानी अभिनेत्री वीना मलिक आपल्या आगामी ‘जिंदगी ५०-५०’ या सिनेमाचं ज्या पद्धतीने प्रमोशन करत आहे, ते पाहून पाहाणाऱ्यांचे डोळेच पांढरे झाले आहेत. कामाठीपुऱ्यात जाऊन वीनाने आपल्या सिनेमाचं प्रमोशन केलं.
वीना मलिक आणि राजन वर्मा आपल्या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी कामाठीपुऱ्यात गेले. कामाठीमपुरा हा मुंबईतला कुख्यात रेड लाइट एरिआ आहे. इथे मोठ्या संख्येने सेक्स वर्कर्स राहातात. वीना या सेक्स वर्क्र्सना भेटली. या महिलांना तिने कंन्डोमही वाटले. तसंच, या महिलांशी वीना बऱ्याच वेळ गप्पा मारत होती.
वीना मलिक ‘जिंदगी ५०-५०’ या सिनेमात सेक्स वर्करची भूमिका साकारत आहे. त्यामुळे या सिनेमासोबत आपल्या व्यक्तिरेखेचं प्रमोशन करण्यासाठी तिने हा अजब मार्ग निवडला. या आधीही आपलं व्यक्तिरेखा सत्य घटनेवरून प्रेरित असल्याचं तिने म्हटलं होतं. ही भूमिका करून आपल्याला खूप आनंद झाल्याचं तिने म्हटलं होतं.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, May 21, 2013, 16:10