Last Updated: Friday, July 12, 2013, 23:25
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बुजूर्ग अभिनेते प्राण यांचे आज मुंबईच्या लिलावती रुग्णालयात निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते.
नुकतेच त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
‘यमला जट’ हा प्राण यांचा पहिला चित्रपट होता. फाळणीनंतर प्राण मुंबईला आहे, फिल्म खानदान मध्ये त्यांनी हिरोची भूमिका केली होती. आतापर्यंत ३५० पेक्षा अधिक चित्रपटात प्राण यांनी भूमिका केल्या आहेत. त्यातील त्यांच्या खलनायकाच्या भूमिका अजरामर ठरल्या.
उपकार, जंजीर, डॉन, दुनिया हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत.
त्यांच्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये ‘खानदान’, ‘औरत’, ‘बड़ी बहन’, ‘जिस देश में गंगा बहती है’, ‘हाफ टिकट’, ‘उपकार’, ‘पूरब और पश्चिम’, ‘डॉन’आणि ‘जंजीर’ यांचा समावेश आहे. भारत सरकारने त्यांना भारतीय सिनेमाच्या योगदानासाठी पद्म भूषण पुरस्कार २००१मध्ये देण्यात आला आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Friday, July 12, 2013, 21:53