अनुष्काच्या `लिप जॉब`वर संतापला विराट!, virat kohli furious over anushka sharma`s lip job rumours

अनुष्काच्या `लिप जॉब`वर संतापला विराट!

अनुष्काच्या `लिप जॉब`वर संतापला विराट!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यात काहीतरी शिजतंय, असं अनेकदा उघड झालंय. आता, तर विराटनं याबद्दल काहीही न बोलताही याची धडधडीत कबुलीच देऊन टाकलीय.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनं ओठांवर शस्त्रक्रिया केली असल्याच्या चर्चा काही तिची पाठ सोडण्याचं नाव घेईना... याचसंबंधीच विराटला प्रश्न विचारला गेला, तर कूल विराट चांगलाच तापला.

त्याचं झालं असं की, एका पत्रकारानं विराटला अनुष्काच्या लिप सर्जरीबद्दल प्रश्न केला यामुळे विराट चांगलाच संतापला. इतकंच नाही तर, विराटनं न्यूझीलंड दौऱ्यातील अनुष्काचा आणि त्याचा खाजगी क्षणातला फोटो प्रसिद्ध केल्याबद्दलही मीडियाला चांगलंच फैलावर घेतलं.

सूत्रांच्या माहितीनुसार, विराट कोहलीचं म्हणण्यानुसार हा अनुष्काचा खाजगी प्रश्न आहे आणि त्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा कुणालाही अधिकार नाही.

गेल्या काही दिवसांपूर्वी अनुष्का करण जोहरच्या `कॉफी विथ करण` या कार्यक्रमात दिसली होती. यावेळी तिचा लूक बराचसा वेगळा दिसत होता. त्यानंतर तिनं आपल्या ओठांवर शस्त्रक्रिया केल्याच्या बातम्यांना पुन्हा एकदा उधाण आलं. यानंतर मात्र संतापलेल्या अनुष्कानं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया केली नसल्याचा दावा केला.

तसंच, काही दिवसांपूर्वी न्यूझीलंड विरुद्ध भारत सीरीजच्या वेळी अनुष्का आणि विराटचे काही खाजगी क्षणांतील फोटो इंटरनेटवर पसरले होते. या फोटोंवरून मीडियात त्यांच्या नातेसंबंधांबद्दल जाहीर चर्चा सुरु झाली होती. अनुष्का आणि विराटची पहिल्यांदा भेट एका जाहिरातीच्या शूटींग दरम्यान झाली होती.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, February 18, 2014, 15:43


comments powered by Disqus