Last Updated: Saturday, December 14, 2013, 18:34
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई अभिनेता हृतिक रोशनची १३ वर्ष जीवनसंगिनी राहिलेली सुझाननं आज सांगितलं की, आम्ही वेगळं राहणं ही आमची व्यक्तिगत पंसती आहे.
मात्र ते आपल्या दोन्ही मुलांची योग्य पद्धतीनं काळजी घेणार आहे. सुझाननं म्हटल्याप्रमाणे आम्ही दोघंही वेगळं व्यक्तीमत्त्व आहोत. पण एकमेकांबद्दल आमच्या मनात आदर आहे आणि तो राहणार. तसंच आम्ही आमच्या जीवनाचे रस्ते स्वत:च ठरवले आहेत.
हृतिकनं `कहो ना... प्यार है` या चित्रपटातून आपल्या कॅरिअरला सुरुवात केली. त्यानंतर हृतिकनं सुझानशी २० डिसेंबर २००० रोजी लग्न केलं. लग्नाच्या आधी अनेक वर्ष दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. या दोघांनंतर रिहान आणि रिधान नावाचे दोन मुलं देखील आहेत.
अभिनेता संजय खानची मुलगी सुझाननं म्हटलं की, आमचे दोन मुलं आहेत आणि त्यांच्या प्रती आम्ही आमची जबाबदारी अखंड असेल, आम्ही त्या दोघांची काळजीही घेणार आहोत. या गोष्टीला कोणी ही बदलू शक्त नाही.
हृतिक आणि सुझाननं दोघं वेगळे होत असल्याची माहिती त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला १३ वर्ष पूर्ण व्हायच्या काही दिवसांपूर्वीच दिलीय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, December 14, 2013, 18:26