बिग बीने सलमान खानचे का केले कौतुक?, Why did Amitabh Bachchan congratulate Salman Khan?

बिग बीने सलमान खानचे का केले कौतुक?

बिग बीने सलमान खानचे का केले कौतुक?
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई

दबंगस्टार सलमान खान याचे कोड कौतुक बिग बी आणि महानायक अमिताभ बच्चन यांनी केलं आहे. रूपेरी पडद्यावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल खास अभिनंदन केले.

सलग १५ वर्षे बॉलिवूडमध्ये राहणे सोपे नसून उत्कृष्ट अभिनयामुळेच ते शक्य झाले आहे. आज सलमान इंडस्ट्रीमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये एक आहे, असे गौरवोद्गारही अमिताभनी काढले.

अमिताभ बच्चन आणि सलमानने अनेक चित्रपटांमधून एकत्र काम केले असून बागबान, बाबूल, गॉड तुसी ग्रेट हो यामधील दोघांच्या भूमिका सर्वांच्याच लक्षात राहिल्या. सलमानच्या यशाबद्दल बोलताना बिग बी यांनी खास सल्लूचे कौतुक केले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, August 27, 2013, 09:58


comments powered by Disqus