Last Updated: Monday, February 4, 2013, 17:42
www.24taas.com, मुंबईसत्तरीच्या दशकातील बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री झीनत अमान पुन्हा लग्न करण्यासाठी सज्ज झाली आहे. ६० वर्षांच्या झीनत अमानने लग्नाची घोषणा केली, पण कुणाशी करणार आहे, हे मात्र तिने अजून गुलदस्त्यातच ठेवलं आहे.
मात्र ज्याच्याशी आपण लग्न करणार आहोत, ती व्यक्ती भारतीयच आहे एवढं मात्र झीनत अमानने सांगितलं आहे. झीनत अमानची दोन्ही मुलं अजान (२६) आणि जहान (२३) आपल्या निर्णयावर खुश असल्याचं झीनतने म्हटलं आहे.
गतकालीन सेक्स सिम्बॉल म्हणून नावाजलेली झीनत आपल्या लग्नाबद्दल बोलताना म्हणाली, की मजहर खानच्या मृत्यूनंतर लग्नाचा विचारच मी केला नाही. लग्नाचा विचार म्हणजे एखादं दुःस्वप्न असल्याचं वाटत होतं, मात्र देवाच्या मर्जीपुढे काही चालत नसल्यामुळे ‘ती’ व्यक्ती माझ्या आयुष्यात आली, आणि माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली. लग्नाबद्दल मला आनंदही आहे आणि पुन्हा तरुण झाल्यासारखं मला वाटू लागलंय असं झीनत अमान म्हणाली.
झीनत आमान हिचा विवाह मजहर खानसोबत झाला होता. मात्र तो आणि त्याचं कुटुंब झीनतला मारहाण करत असल्याच्या बातम्या लोकांसमोर येऊ लागल्या होत्या. तिची दोन्ही मुलंही तिच्याशी चांगली वागत नसल्याचं काही बातम्यांमधून पुढे आलं होतं.
अभिनेता संजय खानसोबत ती प्रेमप्रकरण चालू असताना संजय खानच्या पत्नीने झीनतला सर्वंसमक्ष मारहाण केली होती. या सर्व प्रकारानंतर झीनतच्या आयुष्यात एका चांगल्या पुरूषाने येऊन तिच्या आय़ुष्याला स्थैर्य द्यावं, अशी आशा झीनतच्या जवळील व्यक्तींची होती. ही इच्छा झीनतच्या ६० व्या वर्षी पूर्ण होत आहे.
First Published: Monday, February 4, 2013, 16:18