Last Updated: Tuesday, February 5, 2013, 20:23
www.24taas.com, मुंबईगेल्या जमान्यातील प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान वयाच्या साठाव्या वर्षी लग्न करण्यास सिद्ध झाली आहे. तिचा नवरा मोठा मुंबईतलाच मोठा बिझनेसमन असून त्याचं वय वर्षं ३६ आहे. दोन मुलांची आई असणाऱ्या झीनतच्या या बोल्ड निर्णयाचं सगळ्यांनी स्वागत केलं आहे.
झीनत अमानला दोन मुलं असून मोठा अजान २६ वर्षांचा तर जहान २३ वर्षांचा आहे. आपल्या आईच्या या दुसऱ्या लग्नाबद्दल मुलांना आनंद झाला आहे. झीनत अमानचा पहिला नवरा मजहर खान याच्या मृत्यूनंतर तिच्या मनात लग्नाबद्दल भीती निर्माण झाली होती. मात्र आता लग्न ठरल्यावर मात्र आपल्याला पुन्हा तरुण झाल्यासारखं वाटत असल्याचं झीनत म्हणाली.
झीनत अमानने तरुण वयात अनेक बोल्ड भूमिका केल्या होत्या. हरे रामा, हरे कृष्णा, सत्यम शिवम सुंदरम, मनोरंजन, इन्साफ का तराजू यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये तिच्या अंगप्रदर्शनामुळे गहजब उडाला होता. झीनत अमानने मिस एशिया काँटेस्ट जिंकली होती. झीनतचं अभिनेता संजय खान सोबत प्रेमप्रकरण बरीच वर्षं गाजत होतं.
First Published: Tuesday, February 5, 2013, 20:23