'दाऊद कनेक्शन असणाऱ्या उद्योगपतीला गृहमंत्र्यांनी वाचविले'

Last Updated: Tuesday, January 14, 2014, 17:53

केद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी कनेक्शन असणाऱ्या एका उद्योगपतीला चौकशीच्या कचाट्यातून वाचवल्याचा आरोप माजी गृहसचिव आमि भाजप नेते आर. के. सिंग यांनी केला आहे.

दाभोलकरांनी कुणाचं केलं नुकसान? पोलिसांसमोर प्रश्न

Last Updated: Wednesday, August 28, 2013, 15:23

निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आता एक आठवडा उलटून गेलाय. मात्र, अजुनही या प्रकरणाचा तपास अधांतरीच आहे. आता पोलिसांनी आपला मोर्चा व्यावसायिकांकडे वळवलाय.

व्यापाऱ्यांचा संप मिटण्याची शक्यता

Last Updated: Monday, May 20, 2013, 09:34

एलबीटीविरोधात व्यापा-यांनी पुकारलेला संप मिटण्याची शक्यता आहे. आज व्यापा-यांच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत तोडगा निघण्याची अपेक्षा आहे.

एलबीटीवर तोडगा काढा – शरद पवार

Last Updated: Thursday, May 9, 2013, 13:28

मुंबईच्या बाजारपेठा बंद राहणं हे अयोग्य आहे. एलबीटी प्रश्नी राज्य सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलाय.

मुजोर व्यापाऱ्यांनी सीएम, राज, उद्धव यांना धुडकावले

Last Updated: Thursday, May 9, 2013, 12:48

एलबीटी कर रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात व्यापाऱ्यांनी संप पुकारलाय. याचा सर्वसामान्यांना प्रचंड त्रास होतोय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेकांनी जनतेला वेठाला न धरण्याचं आवाहन वारंवार केलंय. असं असतानाही व्यापाऱ्यांनी संप सुरूच ठेवलाय. आता मनसे आणि शिवसेना याबाबत काय भूमिका घेणार, याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागलंय.

सत्तेत आलो तर एलबीटी रद्द - फडणवीस

Last Updated: Wednesday, May 8, 2013, 07:21

भाजपचा एलबीटीला विरोध असून राज्यात सत्ता आल्यास एलबीटी रद्द करु अशी भूमिका भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मांडलीये. एलबीटी मुख्य़मंत्र्यांचे अपत्य आहे अशी टीकाही त्य़ांनी केलीये.

लग्नाच्या बातम्या निरर्थक, झीनतनं केलं स्पष्ट

Last Updated: Thursday, February 7, 2013, 07:50

सत्तरच्या दशकातील बॉलिवूडवर वर्चस्व गाजवणारी अभिनेत्री झीनत अमान हिच्या लग्नाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून चांगलीच रंगतेय. पण...

झीनत अमानचा नवा नवरा शिवसैनिक?

Last Updated: Wednesday, February 6, 2013, 17:10

सत्तरीच्या दशकातील अभिनेत्री झीनत अमान हिच्या लग्नाबद्दलच्या बातम्या सध्या येत आहेत. अखेर झीनत अमानचा नवरा कोण या प्रश्नावरून पडदा उठला आहे.

साठ वर्षांची झीनत अमान, ३६ वर्षांचा नवा नवरा

Last Updated: Tuesday, February 5, 2013, 20:23

गेल्या जमान्यातील प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान वयाच्या साठाव्या वर्षी लग्न करण्यास सिद्ध झाली आहे. तिचा नवरा मोठा मुंबईतलाच मोठा बिझनेसमन असून त्याचं वय वर्षं ३६ आहे. दोन मुलांची आई असणाऱ्या झीनतच्या या बोल्ड निर्णयाचं सगळ्यांनी स्वागत केलं आहे.