चौथ्या दिवशी किवींनी रडवलं, मॅकुलम त्रिशतकाकडे, 2nd Test: McCullum`s double ton changes course of th

चौथ्या दिवशी किवींनी रडवलं, मॅकुलम त्रिशतकाकडे

चौथ्या दिवशी किवींनी रडवलं, मॅकुलम त्रिशतकाकडे
www.24taas.com, झी मीडिया, वेलिंग्टन
वेलिंग्टन टेस्टमध्ये न्यूझीलंड टीमनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. किवींनी चौथ्या दिवसअखेर 6 विकेट्स गमावून 571 रन्सपर्यंत मजल मारली आहे. न्यूझीलंडकडे आता 325 रन्सची आघाडी आहे.

कॅप्टन ब्रेंडन मॅककलम 281 रन्सवर आणि जिमी निशाम 67 रन्सवर नॉटआऊट आहे. तत्पूर्वी, मॅककलम आणि ब्रॅडली वॉटलिंगनं सहाव्या विकेटसाठी 352 रन्सची रेकॉर्डब्रेक पार्टनरशिप केली.

वॉलिंगनं 124 रन्सची शानदार इनिंग खेळली. तर मॅककलमनं सीरिजमधील सलग दुस-या डबल सेंच्युरीची नोंद केली. त्याचप्राणे त्यानं आपल्या टेस्ट करिअरमधील तिन्ही डबल सेंच्युरीज या भारताविरुद्धच झळकावल्या आहेत. आता भारतीय टीमला अखेरच्या दिवशी टेस्ट वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, February 17, 2014, 18:21


comments powered by Disqus