वेलिंग्टन कसोटी ड्रॉ, मालिकेत भारताचा पराभव

Last Updated: Tuesday, February 18, 2014, 12:10

वेलिंग्टन कसोटी सामना ड्रा घोषित करण्यात आला आहे. कर्णधार मॅक्क्यूलम आणि कर्णधार धोनीच्या सहमतीने हा सामना ड्रॉ घोषित करण्यात आला. यावरून न्यूझीलंडमधील कसोटी मालिकेत भारताचा पराभव झाला आहे.

चौथ्या दिवशी किवींनी रडवलं, मॅकुलम त्रिशतकाकडे

Last Updated: Monday, February 17, 2014, 19:10

वेलिंग्टन टेस्टमध्ये न्यूझीलंड टीमनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. किवींनी चौथ्या दिवसअखेर 6 विकेट्स गमावून 571 रन्सपर्यंत मजल मारली आहे. न्यूझीलंडकडे आता 325 रन्सची आघाडी आहे.

भारताची २४६ रन्सची आघाडी, न्यूझीलंड १ बाद २४

Last Updated: Saturday, February 15, 2014, 11:54

दुसऱ्या कसोटीवर न्यूझीलंडविरुद्ध खेळताना भारताने आपली पकड मजबूत केली आहे. अजिंक्य रहाणेचे शतक आणि शिखर धवनच्या ९८ रन्स खेळीच्या जोरावर भारतानं पहिल्या डावात २४६ रन्सची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडची अवस्था एक बाद २४ अशी आहे.

LIVE स्कोअरकार्ड :भारत X न्यूझीलंड (दुसरी टेस्ट)

Last Updated: Tuesday, February 25, 2014, 22:07

भारत विरुद्ध न्यूझीलंड सीरिजमधल्या दुसऱ्या आणि शेवटची टेस्ट. पाहा स्कोअरकार्ड...

हैदराबादमध्येच होणार दुसरी कसोटी

Last Updated: Friday, February 22, 2013, 12:18

हैदराबादमध्ये झालेल्या दोन स्फोटांमुळे ऑस्ट्रेलियाचा संघही चांगला हादरला असून त्यांनी हैदराबादमध्ये सामना खेळण्यास नकार दिला होता. परंतु, दुसरी कसोटी हैदराबादमध्ये खेळविण्यात येणार असल्याचे बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले.

इंग्लंडकडून टीम इंडियाचा धुव्वा, मालिकेत बरोबरी

Last Updated: Monday, November 26, 2012, 11:57

टीम इंडियाचा इंग्लंडने धुव्वा उडवला आणि कसोटी मालिकेत १-१ची बरोबरी साधली. माँटी पानेसरने अर्धा संघ तंबूत पाठविला. त्यामुळे मुंबई टेस्टमध्ये इंग्लंडने दहा गडी राखून सहज विजय मिळवला.

टीम इंडियाचा खुर्दा, इंग्लंड करणार मात

Last Updated: Monday, November 26, 2012, 11:21

मुंबईत वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुस-या कसोटीत टीम इंडिया दुसरा डाव अवघ्या १४२ रन्सवर आटोपला. इंग्लंडला विजयासाठी केवळी ५७ रन्सची आवश्यकता आहे.

इंग्लंड ऑलआऊट, सेहवागची विकेट

Last Updated: Sunday, November 25, 2012, 15:04

मुंबई टेस्टमध्ये इंग्लिश बॅट्समन्सच्या धडाक्यामुळे भारतीय बॉलर्सना घाम फुटला होता. मात्र, फिरकीने जादू करीत ४१३ वर इंग्लिश टीमला ऑलआऊट केली. ८६ रन्सची आघाडी घेली आहे. तर भारतीने दुसऱ्या डावाला सुरूवात केली असून वीरेंद्र सेहवाग ९ रन्सवर आऊट झाला. गौतम गंभीर १९ धावांवर खेळत आहेत. भारताने ३० रन्स केल्यात.

मुंबई कसोटीमध्ये रंगत, इंग्लंडच्या सहा विकेट

Last Updated: Sunday, November 25, 2012, 15:00

मुंबई कसोटीत भारत अडचणीत असताना टीम इंडीयाच्या गोलंदाजीला धार आलीय. इंग्लंडच्या सहा विकेट काढल्यात. त्याआधी इंग्लंडच्या केविन पीटरसनने तडाखेबाज दीडशतक ठोकले. इंग्लंडने आघाडी घेतली आहे.

मॅच वाचवण्याचं आव्हान, खराब सुरवात

Last Updated: Thursday, January 5, 2012, 10:50

भारतासमोर आस्ट्रेलियाने धावांचा डोंगर उभा केला आहे, भारताला मॅच वाचवण्याचं आव्हान आहे. त्यातच टीम इंडियाची सुरवात ही पुन्हा एकदा खराब झाली आहे. धडाकेबाज वीरेंद्र सेहवाग फक्त ४ रन्स बनवून तंबूत परतला आहे.

वेस्ट इंडिजला लोळवलं

Last Updated: Thursday, November 17, 2011, 08:18

दुसऱ्या टेस्टमध्ये वेस्ट इंडिजने सुरवातीला केलेल्या चिवट फलंदाजीनंतर मात्र वेस्ट इंडिजचा डाव गडगडला. इंडियन बॉलर्सने पुन्हा एकदा कमाल केली. त्याच्या बॉलिंगपुढे पुन्हा एकदा विंडीज बॅट्समन्सनी नांगी टाकली.

वेस्ट इंडिज पराभवाच्या छायेत

Last Updated: Wednesday, November 16, 2011, 07:36

वेस्ट इंडिजची पहिली इनिंग केवळ १५३ रन्सवरच गडगडली. अजूनही वेस्ट इंडिज ४७८ रन्सने मागे आहे. टीम इंडियाने वेस्ट इंडिजला फॉलोऑन दिला आहे. फॉलोऑन साठी आलेल्या वेस्ट इंडिजची सुरवात पुन्हा एकदा खराब झाली. उमेश यादवने पहिली विकेट घेत वेस्ट इंडिजला जबरदस्त धक्का दिला

इंडिया पहिली इनिंग @ 631/7

Last Updated: Tuesday, November 15, 2011, 08:59

इंडियाचा दुसरा दिवस हा गाजवतो आहे तो व्हीव्हीएस लक्ष्मण, त्याने शैलीदार फलंदाजीचं अक्षरश: दर्शनच घडवलं, त्याने वेस्ट गोलंदाजीला गोंजारत गोंजारत सीमेपलीकडे धाडले आणि आपले दिडशतकी देखील साजरे केले. त्याने २४८ बॉल्समध्ये १५० केले.