Last Updated: Wednesday, September 18, 2013, 21:23
www.24taas.com, झी मीडिया, इस्लामाबादझिम्बाब्वे विरुद्धच्या निराशाजनक सीरिजनंतर पाकिस्तानच्या टीममध्ये पुन्हा एकदा नेतृत्वबदलाचे वारे वाहू लागलेत. पाकिस्तानच्या वन-डे टीमचे नेतृत्व शाहीद आफ्रिदीकडे सोपवण्याच्या पर्यायावर सध्या गांभीर्याने विचार सुरु आहे. शाहिद आफ्रिदीनंही कॅप्टनसीचा काटेरी मुकूट परिधान करण्यास तयार असल्याचे स्पष्ट केल्यानं या शक्यतांना अधिकच बळकटी आलीय.
पीसीबीनं माझ्यापुढे कॅप्टनसीचा प्रस्ताव ठेवल्यास मी आनंदाने त्याचा स्वीकार करेन, असं त्यांनी सांगितले. दक्षिण आफ्रिकेविरुद्घच्या सीरिजमध्ये टीममधल्या सीनियर खेळाडूंनी अधिक योगदान द्यावं असंही तो म्हणाला. भारतीय उपखंडात 2011 मध्ये झालेल्या वर्ल्डकपच्या वेळी आफ्रिदी कॅप्टन होता. त्यानंतर पीसीबीशी झालेल्या मतभेदामुळे त्याची टी-20 आणि वन-डे टीमच्या कॅप्टनसीवरुन हाकलपट्टी करण्यात आली होती.
आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संयुक्त अरब अमिराती ( यूएई) मध्ये होणा-या वन-डे सीरिजसाठी आफ्रिदीकडे नेतृत्व सोपवण्यात येऊ शकतं अशी माहिती सुत्रांनी दिलीय. टेस्ट टीमचा कॅप्टन मिसबाह-उल-हककडेच कायम ठेवण्यात येईल. पण वन-डेसाठी आफ्रिदी हा प्रबळ दावेदार आहे, अशी माहिती पीसीबीच्या सुत्रांनी दिलीय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, September 18, 2013, 21:23