आफ्रिदीला व्हायचंय पुन्हा कॅप्टन

Last Updated: Wednesday, September 18, 2013, 21:23

पीसीबीनं माझ्यापुढे कॅप्टनसीचा प्रस्ताव ठेवल्यास मी आनंदाने त्याचा स्वीकार करेन, असं त्यांनी सांगितले. दक्षिण आफ्रिकेविरुद्घच्या सीरिजमध्ये टीममधल्या सीनियर खेळाडूंनी अधिक योगदान द्यावं असंही तो म्हणाला.

टीम इंडिया आज जिंकणार का?

Last Updated: Sunday, January 6, 2013, 12:48

टीम इंडियाने पाकिस्तानमसोर वनडे क्रिकेटमध्ये गुडघे टेकले आहे. त्यामुळे वारंवार अपयशी ठरणारी टीम इंडिया शेवट गोड करणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

भारत X पाकिस्तान : स्कोअरकार्ड

Last Updated: Thursday, January 3, 2013, 20:10

ईडन गार्डनवर भारत-पाकिस्तानमध्ये सीरिजची दुसरी वनडे रंगतेय. सीरिजमध्ये १-०नं पिछाडीवर असणाऱ्या टीम इंडियासाठी ही लढत `करो वा मरो` ठरतेय

भारताचा खुर्दा

Last Updated: Thursday, January 3, 2013, 20:04

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ऐतिहासिक ईडन गार्डनवरील दुसरा एकदिवसीय सामनाही भारताने ८६ धावांनी गमावला. याचबरोबर भारताने तीन सामन्यांची मालिका २-० अशी गमावली आहे. तब्बल ७ वर्षांनी भारताला मायभूमीत पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला आहे.

ईडन गार्डनवर टीम इंडिया जिंकणार का?

Last Updated: Wednesday, January 2, 2013, 19:14

ईडन गार्डनवर भारत-पाकिस्तानमध्ये सीरिजची दुसरी वनडे रंगणार आहे. सीरिजमध्ये 1-0 नं पिछाडीवर असणा-या टीम इंडियासाठी ही लढत करो वा मरो अशीच असणार. तर पाकिस्तानी टीम कोलकात्यातच सीरिज जिंकण्यासाठी आतूर असणार.

भारत पराभवाचा बदला घेणार ?

Last Updated: Thursday, December 27, 2012, 18:27

भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये पुन्हा एकदा क्रिकेटच्या रणांगणावर टी-20ची लढत रंगणार आहे. टीम इंडिया पराभवाचा बदला घेण्यासाठी आतूर असेल तर दुसरीकडे पहिल्या टी-20त विजय मिळवल्याने पाकिस्तान टीमचा आत्मविश्वास उंचावलेला असेल. आता या निर्णायक लढतीत कोण बाजी मारत हे पाहणं रंगतदार ठरणार आहे.

चुरशीच्या सामन्यात पाक विजयी

Last Updated: Tuesday, December 25, 2012, 22:55

मोहम्मद हाफिज आणि शोएब मलिक यांच्या अर्धशतकी भागीदारीमुळे पाकिस्तानने भारतावर पहिल्या सामन्यात विजय मिळवला. विजयासाठी 3 चेंडुंमध्ये 6 धावांची गरज असताना मलिकने रविंद्र जडेजाला षटकार ठोकून विजयावर शिक्कामोर्तब केले.

भारत-पाक सामन्यांना तालिबानची धमकी

Last Updated: Sunday, December 23, 2012, 20:43

अनेक जणांचा विरोध डावलून शनिवारी पाकिस्तान संघाचं भारतात आगमन झालं. शिवसेनेने भारत-पाक सामन्यांना यापूर्वीच विरोध दर्शवला आहे. आता तालिबाननेही भारत- पाक सामन्यांचा निषेध करत हे सामने झाल्यास हिंसक कारवाई करण्याची धमकीही दिली आहे.

`फिक्सिंग आमची संस्कृती`, अख्तरने काढली पाकची लक्तरं

Last Updated: Monday, October 8, 2012, 06:59

क्रिकेटमध्ये फिक्सिंग करणं ही पाकिस्तानची संस्कृती असल्याचं धक्कादायक विधान पाकिस्तानी बॉलर शोएब अख्तरने केलंय. त्याच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानची क्रिकेट टीम चांगलीच अडचणीत येण्याची शक्यता आहे.

भारत-पाक सामन्यांस पाकिस्तानी हिंदूंचा विरोध

Last Updated: Monday, August 27, 2012, 16:52

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने पुन्हा सुरू करण्यावर सुनिल गावस्कर यांच्यासारख्या ज्येष्ठ भारतीय क्रिकेटपटूंपासून ते अनेक भारतीय नागरिकतांनी विरोध दर्शवला असता, आता पाकिस्तानातील हिंदू कुटुंबांनीही या गोष्टीला विरोध दर्शवला आहे. मात्र, पाकिस्तानी हिंदू देत असलेलं कारण अतिशय उद्विग्न करणारं आहे.

शोएबला शिरायचंय कोचच्या भूमिकेत

Last Updated: Saturday, August 18, 2012, 08:08

पाकिस्तानचा सुपरफास्ट बॉलर शोएब अख्तरनं आपल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत परत यायचंय. पण, यावेळी त्याला खेळाडू म्हणून नाही तर बॉलिंग प्रशिक्षकाची भूमिका निभावण्याची इच्छा आहे.

पाकला हवाय मॅचच्या उत्पन्नात हिस्सा

Last Updated: Wednesday, July 18, 2012, 13:32

डिसेंबरमध्ये आयोजित केलेली भारत-पाकिस्तान मॅच सीरिज अगोदरच वादात अडकलीय, त्यात आता आणखी भर पडण्याची शक्यता आहे ती मैदानाबाहेरच्या काही मुद्यांमुळे... कारण, या मॅचदरम्यान मिळणाऱ्या उत्पन्नात हिस्सा मिळावा, अशी मागणी आता पीसीबी अर्थात पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं केलीय.

भारत-पाक वन डे मालिकेला मंजूरी

Last Updated: Monday, July 16, 2012, 17:32

भारत आणि पाकि‍स्‍तानात दोन्‍ही देशांमध्‍ये गेल्या बऱ्याच काळापासून बंद असलेल्या क्रिकेट मालिकेला मंजूरी मिळाली आहे. पाकिस्‍तानी क्रिकेट संघ येत्‍या डिसेंबरमध्‍ये भारताच्‍या दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेत तीन एक दिवसीय सामने होणार आहेत.

भारत-पाक सामन्यांना महाराष्ट्र काँग्रेसचा विरोध

Last Updated: Monday, July 16, 2012, 16:27

पाच वर्षानंतर होत असलेल्या भारत पाक क्रिकेट सीरिजला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनं विरोध केलाय. पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामने खेळवण्याबाबत बीसीसीआयनं फेरविचार करावा अशी मागणी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी केली आहे.

पाकिस्तान प्रीमियर लीगसाठी भारताला आमंत्रण

Last Updated: Thursday, June 7, 2012, 15:45

पाकिस्तान प्रीमियर लीग (पीपीएल) कधी सुरू होणार आहे, हे अजून नक्की नाही. त्याच्या तारखा अजून ठरलेल्या नाहीत की योजना अजून बंद दाराच्या बाहेर पोहोचल्या नाहीत. तरीही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झाका अश्रफ यांनी भारतीय खेळाडूंना पीपीएलसाठी आमंत्रित करणार असल्याची घोषणा केली आहे

पाकिस्तानी क्रिकेट टीम भारतात येणार...

Last Updated: Sunday, May 13, 2012, 11:39

विस्कटलेले राजनैतिक संबंध आणि राजकीय विरोध यामुळे हद्दपार झालेलं भारत-पाकिस्तान क्रिकेट आता पुन्हा रंगण्याची चिन्ह आहेत. ऑक्टोबरमध्ये भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बीसीसीआयनं पाकिस्तान संघाला आमंत्रण दिलं आहे.

भारत-पाक क्रिकेट सिरीज सुरू व्हावी - झरदारी

Last Updated: Monday, April 9, 2012, 12:25

झरदारी यांच्या बरोबरच्या चर्चेत भारताने दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. मुंबई हल्ल्यातल्या दोषींवर कारवाई करण्याचा मुद्दा भारताकडून उपस्थित करण्यात आला. द्विपक्षीय व्यापार वाढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याबाबतही चर्चा झाली. भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सिरीज सुरु करण्याची मागणी झरदारींनी पंतप्रधानांकडे केल्याचं सुत्रांनी सांगितलं.

पुन्हा कॅप्टनचं पद 'तौबा तौबा'- आफ्रिदी

Last Updated: Thursday, January 5, 2012, 18:40

गेल्या वर्षी वेगवेगळ्या कारणांमुळे वादग्रस्त ठरलेल्या आपल्या कॅप्टनपदाचा उबग येऊन पुन्हा कॅप्टन न होण्याचा निर्णय पाकिस्तानी खेळाडू शाहिद आफ्रिदीने घेतला आहे.

'आयपीएल'पेक्षा 'बिग', म्हणे पाकची प्रीमियर लीग !

Last Updated: Wednesday, January 4, 2012, 21:53

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड(पीसीबी) लवकरच स्वतःची प्रीमियर लीग सुरू करणार असून ही प्रीमियर लीग आयपीलपेक्षा मोठी असणार आहे असं विधान पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चे अध्यक्ष चौधरी झाका अश्रफ यांनी केलं आहे.