Last Updated: Friday, May 17, 2013, 13:04
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीआयपीएल स्पॉट फिक्सिंगचे कोडं आता हळूहळू उलगडू लागलं आहे. IPL फिक्सिंग प्रकरणात अंकित चव्हाण याने फिक्सिंगची कबुली दिली असल्याचे सुत्रांकडून समजते. IPL फिक्सिंग प्रकरण अंकित चव्हाण सह अजित चंदेलिया याने देखील कबुली दिली आहे. त्यामुळे फिक्सिंग प्रकरणात काय घडलं हे लवकरच समोर येईल.
आयपीएलच्या फिक्सिंग प्रकरणात अटक केलेल्या तीनही खेळाडूंची वेगवेगळ्या ठिकाणी चौकशी करण्यात आली. त्यांच्यात काय बोलणं झालं याची देखील चौकशी करण्यात येत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार अजित चंदेलिया याने आयपीएलच्या मागील वर्षाच्या सीजनमध्येही फिक्सिंग केल्याचे कबूल केले आहे.
श्रीसंत, अजित आणि अंकित यांची चौकशी आता पोलीस कमिशनर करणार आहे. त्यामुळे त्यांच्या चौकशीनंतरच या प्रकरणाचा उलगडा होईल. फिक्सिंग प्रकरणातील खेळाडूंवर मोक्का लावण्याच्या तयारीत पोलीस असल्याचे समजते. या खेळाडूंवर जर मोक्का लावण्यात आला. तर त्यांना १ वर्षापर्यंत जामिन मिळू शकणार नाही. त्यामुळे आयपीएलची काळी बाजू पुन्हा एकदा समोर आली आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, May 17, 2013, 12:51