Last Updated: Friday, May 17, 2013, 15:52
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईराजस्थान रॉयल्सचे तिन्ही खेळाडू फक्त आपल्या कामासाठी सट्टेबाजांकडून पैसे घेत नव्हते, तर टीम मीटिंगमध्ये होणारी गुप्त चर्चाही सट्टेबाजांना सांगायचे.
सामन्याच्या एक दिवसअगोदर टीम मीटिंग व्हायची, त्या वेळी यात सर्व खेळाडूंची भूमिका निश्चित होत असे. सामन्यानुसार पहिले षटक कोण टाकणार आहे आणि कोण प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार आहे हेसुद्धा टीम मीटिंगमध्ये ठरायचे. ही सर्व माहिती सट्टेबाजांपर्यंत पोहोचायची.
या सत्रात रॉयल्सकडून बर्याणच वेळा अजित चंदेलियाने गोलंदाजीची सुरुवात केली होती.
पाच मे रोजी पुणे आणि राजस्थान रॉयल्समध्ये सामना होता. त्या वेळी बहुदा बुकी स्टेडियममध्ये उपस्थित होता. आयपीएलची तयारी करीत असलेल्या राजस्थान क्रिकेट संघटनेच्या एका वरिष्ठ अधिकार्या ने सांगितले की, साधारणपणे बीसीसीआयच्या अँटिकरप्शन युनिटचे (एसीयू) अधिकारी साऊथ पॅव्हेलियनमध्ये खेळाडूंच्या जवळपास फिरत असतात. मात्र, त्यादिवशी एक अधिकारी अचानक पॅव्हेलियनच्या विरुद्ध स्थित असलेल्या नॉर्थ स्टॅडकडे गेला आणि विशेष भागाची पाहणी केली.
त्या वेळी त्या अधिकार्याहने काही फोटोसुद्धा खेचले. नंतर तो ब्रॉडकॉस्टर रूममध्ये सुद्धा गेला आणि स्टॅँडचे काही रिप्ले बघितले. यापूर्वी एसीयूचा अधिकारी नॉर्थच्या दिशेने कधीही दिसला नव्हता, असेही आरसीएच्या अधिकार्याँने सांगितले.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, May 17, 2013, 15:52