रैनाशी हुज्जत घालणाऱ्या जडेजावर `बीसीसीआय` कोपलं, BCCI seeks explanation from Jadeja on spat with Raina

रैनाशी हुज्जत घालणाऱ्या जडेजावर `बीसीसीआय` कोपलं

रैनाशी हुज्जत घालणाऱ्या जडेजावर `बीसीसीआय` कोपलं
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मॅचमध्ये कॅच सोडल्यानंतर मैदानावरच रविंद्र जाडेजा आणि सुरेश रैना यांच्यात झालेली बाचाबाची एव्हाना सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरलीय. याच घटनेची भारतीय क्रिकेट नियंत्रण समिती अर्थात बीसीसीआयनं गंभीर दखल घेतलीय. अशा प्रकारची बाचाबाची केल्यानं बीसीसीआयनं रविंद्र जडेजाला चांगलंच फटकारलंय आणि त्याला लिखित स्वरुपात यावर उत्तर देण्यास सांगितलंय.

ट्राय सीरिजमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात सुरेश रैनाकडून लागोपाठ दोन कॅच सुटल्या होत्या. यावर रविंद्र जडेजानं त्याच्याशी मैदानावरच बाचाबाची केली. पावसानं प्रभावित झालेल्या या मॅचमध्ये डकवर्थ लुईस पद्धतीच्या आधारे भारतानं वेस्ट इंडिजला मात दिली होती. पण, विजयापेक्षा मैदानावरच झालेल्या या बाचाबाचीचाच प्रभाव प्रेक्षकांवर जास्त पडला.

या घटनेचं व्हिडिओ फुटेज यू ट्यूबवर अपलोड करण्यात आल्यानं आत्तापर्यंत शेकडो जणांनी ही घटना पाहिलीय. वेस्ट इंडिज ३४ व्या ओव्हरवर खेळत असताना पाचव्या बॉलवर सुनील नारायणची इशांत शर्मानं विकेट घेतल्यानंतर जडेजाला रागात रैनाकडे जाताना अनेकांनी पाहिलं. त्यानं रैनाशी बोलताना अपशब्द वापरले. ही गोष्ट रैनाला आवडली नाही, त्यानंही प्रत्यूत्तर दिलं. या दोघांकडे लक्ष असलेल्या कॅप्टन विराट कोहलीनं हस्तक्षेप केल्यानं पुढचा प्रसंग टळला. कोहलीनं रैनाला शांत राहण्यास सांगितलं. रैना मागच्या ओव्हरमध्ये नारायणची कॅच पकडण्यास अपयशी ठरल्यानं जडेजा नाराज होता.

नंतर मात्र मैदानातून बाहेर जाताना दोघांना एकमेकांशी बोलताना आणि हसतानाही पाहिलं गेलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, July 8, 2013, 14:02


comments powered by Disqus