Last Updated: Thursday, December 12, 2013, 16:54
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई सलग सहा वन-डे सीरिज जिंकत धोनी ब्रिगेड दक्षिण आफ्रिकेत पोहचली होती. त्यामुळे माहीच्या टीमला या सीरिजमध्ये विजयाची पसंती देण्यात आली होती. धोनीनं ‘नंबर वन’सारखा खेळ केला नाही आणि सीरिजमध्ये २-० नं मानहानिकारक पराभवाला सामोर जाव लागलं. या पराभवाला बॉलर्स आणि बॅट्समन तर जबाबदार होतेच. शिवाय कॅप्टन धोनीचे चुकीचे निर्णयही तितकेच कारणीभूत ठरले.
दक्षिण आफ्रिकेमध्ये पुन्हा एकदा टीम इंडियाला वन-डे सीरिज जिंकता आली नाही. यासाठी ब्लू-ब्रिगेडची खराब कामगिरी कारणीभूत ठरलीच. शिवाय, कॅप्टन महेंद्रसिंग धोनीच्या चुकीच्या निर्णयामुळे अनेकवेळा टीम बॅकफूटवर गेली. ज्या कॅप्टननं कायमच भारतीय टीमला विजयाचा मार्ग दाखवला. तो धोनी आफ्रिकेविरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये सपशेल अपयशी ठरला.
वन-डे सीरिजमध्ये टीम इंडियाची स्पिन बॉलिंग सुपर फ्लॉप ठरली. यातून धोनीनं काहीच धडा घेतला नाही. धोनी आपल्या भूमिकेवर ठाम राहीला. आणि स्पिनर्सना या सीरिजमध्ये केवळ दोन विकेट्स घेण्यात यश आलं. आर. अश्विननं ३ मॅचेसमध्ये ६ हून अधिकच्या इकॉनॉमी रेटनं १६९ रन्स दिले. त्याचबरोबर रवींद्र जाडेजा या धोनीच्या फेव्हरिट क्रिकेटरला केवळ एकच विकेट घेण्यात यश आलं.
आफ्रिकेच्या वेगवान खेळपट्ट्यांची आणि वातावरणाची थोडीफार कल्पना कॅप्टन धोनीला होती. असं असतानाही धोनी यातून काहीच शिकला नाही. डिव्हिलियर्सनं तीन वन-डे मॅचेसमध्ये फास्ट बॉलर्सवरच टीमची धुरा सोपवली होती. दुसरीकडे धोनीनं कधी फास्ट बॉलर्सवर तर कधी स्पिनर्सकडे जबाबदारी सोपवत अनेक प्रयोग के जे यशस्वी झालेच नाहीत.
पहिल्या दोन वन-डेत धोनीनं टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला. तर डिव्हिलियर्सनं अखेरच्या वन-डेत टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला. आणि ३०१ रन्स करत विशाल स्कोअर उभा केला. आता टेस्ट सीरिज सुरु होणार आहे. यात धोनीनं आपल्या चुकांमधून काही धडा घेतला नाही तर टेस्ट सीरिजमध्येही पराभव भारताची पाठ सोडणार नाही.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, December 12, 2013, 16:54