गावस्करांचा मोठा खुलासा, यंदाही सट्टेबाजांनी केला होता दोघांशी संपर्क

Last Updated: Thursday, May 22, 2014, 21:07

आयपीएलमध्ये सट्टेबाजांनी दोघा क्रिकेटरांशी संपर्क केला असल्याचा खळबळजनक खुलासा बीसीसीआय हंगामी अध्यक्ष सुनील गावस्कर यांनी केला आहे. याची माहिती भ्रष्टाचार निरोधक आणि सुरक्षा पथकाला अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

बुकीचा खुलासा, धौनी आणि रैना फिक्सिंगमध्ये सहभागी

Last Updated: Tuesday, February 11, 2014, 13:41

आयपीएल स्पॉट फिक्सिंगबाबत आता नवा खुलासा बुकींकडून करण्यात आलाय. त्यामुळे भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि आघाडीचा खेळाडू सुरेश रैना अडचणीत आले आहेत. या दोन्ही खेळाडूंचे नाव फिक्सिंग घेतले जात आहे.

मुंबईतला सर्वात मोठा बुकी पोलिसांच्या ताब्यात

Last Updated: Tuesday, July 9, 2013, 17:19

मुंबईतला सर्वात मोठा बुकी शोभन मेहता मुंबई पोलिसांच्या हाती लागलाय. या अटकेमुळे बेटिंग प्रकरणात आणखी बड्या नावांचा पर्दाफाश होणार आहे.

भाव एक रुपया! पाक, दुबईतील फोन्स बंद

Last Updated: Wednesday, June 12, 2013, 10:39

सट्टेबाजीमुळे क्रिकेट विश्व ढवळून निघाले. दिल्ली आणि मुंबई पोलिसांनी सट्टेबाजांना पकडण्यास व्युहरचना केली. काही हाती लागले तर काही भूमिगत झाले. त्यांचा कारनामा सुरूच होता. पाकिस्तान आणि दुबईमार्फत सट्टा लावला जात होता. मुंबईत पोलिसांच्या क्राईम ब्रॅंचच्या टीम काळबादी येथे फिल्डिंग लावली. मात्र, त्याने भाव एक रूपया, असे म्हणताच पाक, दुबईतील फोन क्षणात बंद झालेत.

स्पॉट फिक्सिंगः पुण्यातील बुकीला घेतले ताब्यात

Last Updated: Monday, June 3, 2013, 10:59

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी पोलिसांचे अटकसत्र सुरूच असून मुंबई क्राईम ब्रांचने याप्रकरणी पुण्यातील एका मोठ्या बूकीला ताब्यात आहे.

विंदू पलटला, म्हणे- मयप्पनचा सट्टेबाजीत हात नाही!

Last Updated: Tuesday, May 28, 2013, 16:56

चौकशीदरम्यान विंदू सिंगने आपला जवाब फिरवला आहे. मयप्पन यांचा स्पॉट फिक्सिंगशी संबंध नसल्याचं त्याने म्हटलं आहे.

श्रीनिवासनच्या मुलाचा आरोप मय्यपनचे बुकींशी संबंध

Last Updated: Friday, May 24, 2013, 12:50

बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरूनाथ मय्यपनच्या अडचणीत भर पडलीये. श्रीनिवासन यांचा मुलगा अश्विन यानं मय्यपनचे बुकिंशी घनिष्ट संबंध असल्याचं सांगत त्याला घरचा आहेर दिलाय.

आयपीएल बुकी अटक, CCTV मध्ये कैद...

Last Updated: Tuesday, May 21, 2013, 13:32

आयपीएल मॅचमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावणा-या तीन बुकिंना दिल्ली पोलिसांनी औरंगाबादमध्ये अटक केलीये.

आयपीएलच्या पार्ट्यांमध्ये बुकी करायचे सेटींग?

Last Updated: Tuesday, May 21, 2013, 12:01

आयपीएलच्‍या सर्व पाच हंगामात येथे खेळाडू आपल्‍या खेळापेक्षा पार्टयांमध्‍ये हॉट मॉडेल्‍स आणि नशेत तर्रर्र झालेले दिसून येतात.

स्पॉट फिक्सिंगचं `महाराष्ट्र कनेक्शन` उघड

Last Updated: Sunday, May 19, 2013, 20:45

स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन उघड होतंय. या प्रकरणी आणखी तिघांना औरंगाबादमधून अटक करण्यात आली आहे.

पहा बुकी आणि खेळाडूंमधली `सेटलमेंटची बातचीत`

Last Updated: Friday, May 17, 2013, 13:37

आयपीएलच्या स्पॉट फिक्सिंग दरम्यान बुकी आणि क्रिकेटर यांच्यात झालेली बातचीत समोर आली आहे. काल पत्रकार परिषदेतही पोलिसांकडून याचा खुलासा करण्यात आलेला आहे.

सट्टेबाजांचा हायटेक फंडा

Last Updated: Monday, March 4, 2013, 23:21

सट्ट्याचा धंदा आज हजार कोटींच्या घरात जाऊन पोहोचलाय..मात्र त्यावर लगाम लावण्यात सरकारला अद्यापही यश येतांना दिसत नाही..पोलिसांकडून कारवाई केली जाते पण या धंद्यातला मोठे मासे काही त्यांच्या हाती लागत नाही..

सट्टेबाजांचा प्रणवदांना कौल, ८०० कोटींचा सट्टा!

Last Updated: Thursday, June 14, 2012, 17:23

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतीपदासाठी प्रणव मुखर्जी यांच्या नावावर फुली मारली असली तरी देशभरातील सट्टेबाजांनी प्रणवदांनाच पसंती दिली आहे. सट्टेबाजांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रपतीपदावर सुमारे ८०० कोटींचा सट्टा लागला आहे.

नुपूरच्या तालावर क्रिकेटपट्टू फिदा

Last Updated: Monday, March 19, 2012, 19:02

बॉलिवूड कलाकार आणि मॉडेल नुपूर मेहताने सेंट्रल लंडनमधील एका कॅसिनोत क्रिकेटपट्टूंना भेटल्याची कबूली दिली आहे पण बुकीजसाठी मॅच फिक्सिंगमध्ये कोणतीही भूमिका बजावल्याविषयी इन्कार केला आहे.