Last Updated: Monday, May 6, 2013, 19:24
www.24taas.com, झी मीडिया, बंगळुरूटीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी विरोधात धार्मिक भावनांना दुखाविल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. बंगळुरूच्या स्थानिक कोर्टात सामाजिक कार्यकर्ता जयकुमार हीरमथ यांनी ही केस दाखल केली आहे.
जयकुमार यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार धोनीला एका मॅगझीनच्या कव्हरपेजवर भगवान विष्णूच्या अवतारात दाखविण्यात आले आहे. यात धोनीच्या हात बूटही दाखविण्यात आला आहे. यामुळे हिंदू देवतांचा अपमान झाला आणि हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
भारतीय दंड संहितेच्या कलम २९५ आणि ३४ अंतर्गत स्थानिक कोर्टात अतिरिक्त मुख्य महादंडाधिकारी सी खान यांच्याकडे हे प्रकरण दाखल झाले आहे.
कोर्टाने तक्रारकर्त्याचे म्हणणे मांडण्यासाठी १२ मे रोजी सुनावणी ठेवली आहे.
First Published: Monday, May 6, 2013, 19:24