भारत-इंग्लड टी-२० चा थरार, India need to invest in younger T-20 players

भारत-इंग्लड टी-२० चा थरार

भारत-इंग्लड टी-२० चा थरार
www.24taas.com, पुणे
टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियावर मायदेशातच सीरीज गमावण्याची नामुष्की ओढवल्य़ानंतर आता टी-20 मध्ये धोनी अँड कंपनीची कसोटी लागणार आहे. यंगिस्तानवर भारतीय टीमची आता भिस्त असणार आहे. टेस्ट सीरिजमध्ये लाज आणल्यानंतर आता टी-20 मॅचेसमध्ये भारतीय टीमकडून मोठ्या अपेक्षा असणार आहेत.

पुण्यात रंगणार पहिली टी-20
टेस्ट सीरिजमध्ये इंग्लंडकडून टीम इंडियाला 2-1 ने मानहानिकारक पराभव सहन करावा लागला. . टेस्ट सीरिजमध्ये सपशेल निराशा केल्यानंतर आता टी-20 मध्येही धोनी अँड कंपनीची कसोटीला लागणार आहे. भारतीय टीमला यंगिस्तानकडून टी-20 मध्ये चांगल्या कामगिरी अपेक्षा असणार आहे.

गौतम गंभीरबरोबर अजिंक्य रहाणे आणि अंबाती रायडू या दोघांमध्ये ओपनिंगला कोणाला संधी मिळते ते पाहणं महत्त्वाच ठरणार आहे. तर मिडल ऑर्डरची धुरा युवराज सिंग, विराट कोहली आणि कॅप्टन महेंद्रसिंग धोनीवर असेल. सुरेश रैना आणि मुंबईकर रोहित शर्मा यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार याची मोठी उत्सुकता आहे.

आर. अश्विन, पीयूष चावला आणि रवींद्र जाडेजा या तीन स्पिनर्सह टीम इंडिया उतरते की, दोन स्पिनर्ससह याचा निर्णय कॅप्टन धोनीला घ्यावा लागेल. फास्ट बॉलिंगमध्ये टीम इंडियात अनुभवाची कमी आहे. परविंदर अवाना, भुवनेश्वर कुमार आणि अशोक दिंडा या बॉलर्समध्ये प्लेईंग इलेव्हमध्ये स्थान मिळवण्यासाठी चुरस असेल.

इंग्लंडची टी-20 टीमही युवा आहे. त्यामुळे भारताच्या मजबूत बॅटिंग लाईनअपला रोखण्याचं आव्हान असेल.


इयॉन मॉर्गन, जो रुट आणि जॉनी बेअरस्टोव्हवर इंग्लंडच्या बॅटिंगची भिस्त असणार आहे. तर टीम ब्रेसनन, स्टुअर्ट ब्रॉड आणि समीत पटेलवर भारतीय बॅट्समनना लगाम घालण्याचा प्रयत्न करावा लागेल.

दोन्ही टीम्सची भिस्त यंगिस्तानवरच असणार आहे. त्याचप्रमाणे दोन्ही टीम्स तुल्यबळ आसल्याने क्रिकेटप्रेमींसाठी ही मॅच एक पर्वणीच ठरणार आहे.

First Published: Wednesday, December 19, 2012, 20:04


comments powered by Disqus