Last Updated: Tuesday, December 18, 2012, 16:33
www.24taas.com, कोलकाताटीम इंडियाचा `दादा` सौरव गांगुली हा त्याच्या कारकिर्दीत बराच चर्चेत होता. मात्र त्याच्या एका फोटोने तो चांगलाच अडचणीत आला होता. गांगुली आणि डोनाच्या नात्यात एक वादळही आले होते.
बॉलीवुड अभिनेत्री नगमा आणि सौरव याचा एक फोटो प्रदर्शित झाल्यानंतर या दोघांचे नात्यात बरेच वादविवाद निर्माण झाले होते. त्यांच्या नात्यात कटुता निर्माण होऊन ते तुटण्याच्या मार्गावर आले होते, पण सौरवने ते नाते तुटू न देता त्याच्या संसार सावरला.
पण त्याच्या ह्या फोटोमुळे नगमा आणि सौरव गांगुली यांच्यातील नात्याबाबत प्रसिद्धी माध्यमात बरीच चर्चा रंगली होती. नगमाचं सौरवच्या जास्तीत जास्त जवळ येत असल्याचं दिसून येत होतं. आणि त्यामळेच सौरव आणि त्याची पत्नी डोना ह्यांच्यात वितुष्ट आले होते.
First Published: Tuesday, December 18, 2012, 16:20