सचिननंतर आता टार्गेट धोनी... SUNIL GAVSKAR ON DHONI

सचिननंतर आता टार्गेट धोनी...

सचिननंतर आता टार्गेट धोनी...
www.24taas.com, नवी दिल्ली

इंग्लंडकडून लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीला हटवण्याची मागणी जोर धरू लागलीय. एकानंतर एक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर धोनीवर चांगलीच टीका होतेय.

माजी भारतीय क्रिकेटर सुनील गावस्कर याच्या मते, ‘आता धोनीला टेस्ट टीमच्या कॅप्टनपदावरून काढून टाकलं जायला हवं त्याच्याऐवजी विराट कोहलीला कॅप्टनपदाची संधी मिळायला हवी’. इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये भारतीय टीमला मिळालेल्या जबरदस्त फटक्यानंतर गावस्कर म्हणतात, ‘नागपूर टेस्टच्या शेवटच्या दिवशीपर्यंत माझंही हेच मत होतं की धोनीला पर्याय नाही पण एव्हढ्या खराब परिस्थितीतही शतक झळकावणाऱ्या विराट कोहलीला पाहून मला माझं मत बदलावं लागलं. मला वाटतंय की विराट कोहली टीमची जबाबदारी पेलण्यासाठी संपूर्णरित्या तयार आहे. विराट भविष्यातील भारतीय टीमचं भविष्य आहे आणि या गोष्टीकडे सकारात्मकतेनं पाहायला हवं’.

भारतीय टीममध्ये एकेकाळी दमदार भूमिका निभावणारे श्रीकांतही धोनीचा खेळ पाहून निराश झालेत. ‘धोनी कप्तानपदावर नसेल तर जास्त चांगला खेळू शकेल’ असं त्यांना वाटतंय. धोनीला कॅप्टनपदावरून दूर होण्याचा सल्ला त्यानी दिलाय.

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, तब्बल २८ वर्षानंतर इंग्लंडनं टेस्ट सीरिज जिंकल्यानंतर भारताला आपल्या टीममध्ये आमूलाग्र बदल करण्याची विशेष गरज वाटतेय.

First Published: Tuesday, December 18, 2012, 10:26


comments powered by Disqus