Last Updated: Friday, February 22, 2013, 12:18
WWW.24taas.com नवी दिल्लीहैदराबादमध्ये झालेल्या दोन स्फोटांमुळे ऑस्ट्रेलियाचा संघही चांगला हादरला असून त्यांनी हैदराबादमध्ये सामना खेळण्यास नकार दिला होता. परंतु, दुसरी कसोटी हैदराबादमध्ये खेळविण्यात येणार असल्याचे बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले.
काल झालेल्या स्फोटांनंतर हैदराबादमध्ये होणारा कसोटी सामना खेळण्यासाठी ऑस्ट्रोलिया संघाने नकार दिला होता. त्यामुळे हैदराबादमध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटीबद्दल अनेक तर्क-वितर्क काढले जात होते. परंतु आज झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बी.सी.सी.आय)ने घेण्यात आलेल्या बैठकीत सामना नियोजित स्थळीच खेळविण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.
भारत-ऑस्ट्रोलियात हैदराबादमध्ये खेळवण्यात येणारा सामना रद्द न करण्यात आल्याचे राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले. हा सामना कडक सुरक्षेत खेळला जाणार असल्याचे ही त्यांनी सांगितले
First Published: Friday, February 22, 2013, 12:18