टीम इंडियाचा खुर्दा, इंग्लंड करणार मात , india vs England 2nd Test

टीम इंडियाचा खुर्दा, इंग्लंड करणार मात

टीम इंडियाचा खुर्दा, इंग्लंड करणार मात
www.24taas.com,मुंबई

मुंबईत वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुस-या कसोटीत टीम इंडिया दुसरा डाव अवघ्या १४२ रन्सवर आटोपला. इंग्लंडला विजयासाठी केवळी ५७ रन्सची आवश्यकता आहे.

पहिल्या डावाप्रमाणेच दुस-या डावातही इंग्लंडच्या माँटी पनेसरने टीम इंडियाच्या बॅटींगला खिंडार पाडले. माँटीने अवघ्या ८१ धावांमध्ये ६ गडी तंबूत पाठविले.

केवळ गौतम गंभीरने ६५ रन्सची खेळी मात्र, टीम इंडियाचे अन्य कोणतेही फलंदाज मोठी खेळी न करू शकल्याने टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध फक्त ५६ रन्सची आघाडी घेतली. त्यामुळे टीम इंडियाचा पराभव निश्चित आहे.

First Published: Monday, November 26, 2012, 10:48


comments powered by Disqus