पावसाने केला खेळ खराब, टीम इंडिया नाराज , India vs New Zealand: Rain spoils t-20

पावसाने केला खेळ खराब, टीम इंडिया नाराज

पावसाने केला खेळ खराब, टीम इंडिया नाराज
www.24taas.com, विशाखापट्टणम

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान विशाखापट्टणम इथं होणारी टी-२०मॅच पावसामुळे रद्द झालीय. टीम इंडिया आणि न्यूझीलंड दरम्यान दोन टी-२०मॅचची सीरिज आयोजित करण्यात आलीय.

पहिली टी-२० पावसामुळे रद्द झाली असून आता दुसरी टी-२०मॅच ११सप्टेंबरला चेन्नई इथं खेळवण्यात येईल. दरम्यान १०महिन्यांनंतर कॅन्सरमधून बरा झालेला युवराज सिंग या सीरिजमध्ये कमबॅक करतोय.

तर हरभजन सिंगदेखील टीममध्ये परतलाय. पावसामुळे मॅच रद्द झाल्याने क्रिकेटप्रेमी निराश झाले आहेत. आता प्रेक्षकांच्या न्यूझीलंड सोबत उरलेल्या शेवटच्या टी-२० कडे लक्ष लागून राहिले आहे.


First Published: Saturday, September 8, 2012, 23:11


comments powered by Disqus