Last Updated: Thursday, February 13, 2014, 16:49
www.24taas.com , झी मीडिया, बंगळूरू आयपीएलच्या सातव्या सिझनचा खेळाडूंच्या लिलावाचा आजचा दुसरा दिवस होता. अनकॅप्ड खेळाडूंच्या लिलावाने आजच्या दिवसाची सुरूवात झाली.
गुरूकिरत सिंह दुसऱ्या दिवसाचा पहिला करोडपती खेळाडू ठरला. त्याला किंग्स इलेव्हन पंजाबने त्याला १.३० कोटींना विकत घेतले.
आतापर्यंत दिवसाचा सर्वात महागडा खेळाडू ऋषि धवन ठरला. ऋषि धवनला किंग्स इलेव्हन पंजाबनेच तीन कोटीला विकत घेतले.
* आदित्य तरे याला मुंबई इंडियन्सने १ कोटी ७० लाखांना खरेदी केले. मुंबई इंडियन्सकडून फलंदाज आणि विकेट किपर म्हणून तो भूमिका निभावणार आहे.
* भारताचा अंडर १९ चा कर्णधार विजय झोल याला बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स याने विकत घेतले.
* करण शर्मा याला सनराईजर्स हैदराबाद ३ कोटी ७५ लाखांना खरेदी केले.
* मयांक अग्रवाल १० लाख आधारमूल्य असलेला खेळाडूला दिल्ली डेअरडेविल्सने १ कोटी सहा लाखांना खरेदी केलं,
* आर्यकुमार यादव हा २० लाखांचा आधारमूल्य असलेला खेळाडू कोलकाता नाइट रायडर्सने ७० लाखांना विकत घेतलं.
* के. एल राहुल १० लाख आधारमूल्य असलेल्या खेळाडूला, सनरायजर्स हैदराबादने १ कोटीला खरेदी केलं
* केदार जाधव ३० लाखांचे आधारमूल्य असलेल्या खेळाडूला दिल्ली डेअरडेविल्सने २ कोटींना खरेदी केले.
* मनप्रीत जुनेजाला १० लाखांच्या आधारमुल्यालाच सनरायजर हैद्राबादने खरेदी केले.
* मनीष पांडे २० लाखांचे आधारमुल्य असलेल्या खेळाडूला कोलकाता नाइट रायडर्सने १.७० कोटींना खरेदी केले.
* उन्मुक्त चंद ३० लाखांचे आधारमुल्य असलेल्या खेळाडूला राजस्थान रॉयलने ६५ लाखांना खरेदी केले.
* बाबा अपराजीथ १० लाखांच्या आधारमुल्यालाच चैन्नई सुपर किंग्जने खरेदी केले.
* विजय झोल ३० लाखांचे आधारमुल्य असलेल्या खेळाडूला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने ३० लाखांनाच खरेदी केले.
* श्रीकांथ अनिरूद्धला २० लाखांच्या आधारमुल्यालाच सनरायजर हैद्राबादने खरेदी केले.
ऑलराउंडर्स * सुशांत मराठे १० लाखांच्या आधारमुल्यालाच मुंबई इंडियनने खरेदी केले.
* अंकुश बेन्स १० लाखांच्या आधारमुल्यालाच राजस्थान रॉयलने खरेदी केले.
* मनवींदर बिस्ला २० लाखांच्या आधारमुल्याच्या खेळाडूला कोलकाता * नाइट रायडरर्सने ६० लाखांना खरेदी केले.
* सी एम गौतम २० लाखांच्या आधारमुल्यालाच मुंबई इंडियनने खरेदी केले.
गोलंदाज * इक्बाल अब्दुलाला २० लाखांच्या आधारमूल्य असलेल्या खेळाडूला राजस्थान रायलने ६५ लाखांना खरेदी केले.
* मिथून मिन्हास हा ३० लाखांचे आधारमुल्य असलेला खेळाडू चैन्नईसुपर किंग्जने खरेदी केल.
* रायन टेन डोश्टे १ कोटींच्या आधारमुल्य असलेल्या खेळाडूला कोलकत्ता नाइट रायडर्सने खरेदी केले.
* केवोन कुपर हा ३० लाखांचे आधारमुल्य असलेल्या खेळाडूला राजस्थान रायलने खरेदी केले.
* परवेझ रसुल ३० लाखांचे आधारमुल्य असलेल्या खेळाडूला ९५ लाखांना सनरायजर हैद्राबादने खरेदी केले
* मनदीप सिंग ३० लाखांचे आधारमुल्य असलेल्या खेळाडूला ८० लाखांना किंग्ज इलेव्हन पंजाबने खरेदी केले.
* रजत भाटीया ३० लाखांचे आधारमुल्य असलेल्या खेळाडूला १ कोटी ७० लाखांना खरेदी केले.
फलंदाज >/b>
* पवन नेगीला चैन्नईसुपर किंग्जने १० लाखांच्या आधारभूत किमतीलाच खरेदी केल.
* श्रेयस गोपाल १० लाखांच्या असलेल्या खेळाडूला मुंबई इंडियन्सन खरेदी केले.
* शाहबाज नदीम ३० लाखांच्या आधारमुल्य असणाऱ्या खेळाडूला ८५ लाखांना दिल्ली डेअरडेव्हिल्सने खरेदी केलं.
* प्रविण तांबे ३० लाखांच्या आधारमुल्य असणाऱ्या खेळाडूला राजस्थान रॉयल्सने ३० लाखांना खरेदी केलं.
* सौरभ जकाती याला २० लाखांना रॉयल चॅलेंजर बंगळूरूने खरेदी केल.
* वाय सिंग चहल याला १० लाखांना रॉयल चॅलेंजर बंगळूरूने खरेदी केल.
* कुलदिप सिंग १० लाखांचे आधारमुल्य असणाऱ्या खेळाडूला कोलकत्ता नाइट रायडर्सने ४० लाखांना खरेदी केलं.
फिरकी गोलंदाज
* ईश्वर पांडे १० लाखांचे आधारमुल्य असणाऱ्या खेळाडूला चेन्नई सुपर किंग्जने १.५ कोटींना खरेदी केल.
* अबु नसीम अहमद या ३० लाख आधारमुल्य असलेल्या खेळाडूला रॉयल चॅलेंजर बंगळुरुने खरेदी केले.
* पारसनाथ परमेश्वरम ३० लाख आधारमुल्य असलेल्या खेळाडूला सनरायजर्स हैद्राबादने खरेदी केले.
* संदिप शर्मा ३० लाख आधारमुल्य असलेल्या खेळाडूला किंग्ज इलेव्हन पंजाबने ८० लाखांना खरेदी केले.
* जसप्रित बुम्र्हा २० लाख आधारमुल्य असलेल्या खेळाडूला मुंबई इंडियनने १ कोटी २ लाखांना खरेदी केले.
* अनुरित सिंग २० लाख आधारमुल्य असलेल्या खेळाडूला किंग्ज इलेव्हन पंजाबने खरेदी केले.
* राहुल शुक्ला २० लाख आधारमुल्य असलेल्या खेळाडूला दिल्ली डेअर डेव्हिल्सने ४० लाखांना खरेदी केले.
* धवल कुलकर्णी ३० लाख आधारमुल्य असलेल्या खेळाडूला राजस्थान रॉयल्सने १ कोटी १० लाखांना खरेदी केले.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, February 13, 2014, 13:17