Last Updated: Friday, April 12, 2013, 17:08
www.24taas.com, मुंबईआयपीएलच्या २००८ च्या सिझनमध्ये गाजलेला श्रीशांत-हरभजन सिंग यांच्या थप्पडची गुंज आता पुन्हा ऐकायला आली आहे. या प्रकरणाची चौकशी करणारे सुधीर नानावटी यांनी हरभजनला दोषी ठरवले आहे. श्रीशांतवर झालेला हल्ला हा प्रक्षुब्ध बिलकुल नव्हता, असे नानावटी यांनी म्हटले आहे.
एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत नानावटी म्हणाले, श्रीशांतवर हरभजनने केलेल्या हल्ल्याचे दृष्य सार्वजनिक करण्यात आले नाही. पण यात स्पष्ट दिसते की हरभजनने श्रीशांतला मारले, हे एकदा नाही तर दोनदा मारल्याचेही नानवटींनी सांगितले.
हरभजनने शिस्तभंग समितीसमोर दिलेल्या आल्या जबाबात म्हटले होते, की त्याने उचलले पाऊल हे प्रसंगानुरूप होते, त्यामुळे मला माफ करावे.
त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी सांगितले होते की झाले ते झाले आता आपण हे सारे विसरून पुढे जाऊ या, असे नानावटींनी सांगितले.
हरभजनने मला मारण्याचा अगोदरपासून प्लान बनवला होता, असे म्हणून श्रीशांतने पाच वर्षांपूर्वी झालेल्या हल्ल्याच्या जखमा पुन्हा ताज्या केल्यानंतर नानावटी बोलत होते.
First Published: Friday, April 12, 2013, 16:49