इराकमध्ये यादवी स्वरुप, तेलसाठे धोक्यात

Last Updated: Wednesday, June 18, 2014, 08:07

इराकमध्ये सुरू झालेल्या यादवीनं आणखी गंभीर रूप धारण केलंय. इसिस या अतिरेकी संघटनेच्या फौजा राजधानी बगदादच्या जवळ पोहोचल्या आहेत. तेलसाठ्यांवर हल्ले करण्याची शक्यता आहे.

मुंबईतील रेल्वेचे 22 ठिकाण धोकादायक, होणार बंदोबस्त

Last Updated: Sunday, May 18, 2014, 18:42

पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेची 22 धोकादायक रेल्वे ठिकाणं ही अपघात मुक्त करण्यासाठी `मुंबई रेल्वे विकास महामंडळ` (एमआरव्हीसी) आता काम करणार आहे. जोगेश्वरी-गोरेगाव, ठाणे-कळवा स्टेशनदरम्यान रूळ ओलांडताना दरवर्षी सुमारे ७७ प्रवासी अपघातात आपला जीव गमावतात.

इस्लामाबाद सर्वात धोकादायक शहर

Last Updated: Thursday, February 20, 2014, 18:02

पेराल तसे उगवेल ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल... ही म्हण शेजारी देश पाकिस्तानला तंतोतंत लागू पडतेय... कारण पाकिस्तानची राजधानी असलेलं इस्लामाबाद हे शहर सगळ्यात धोकादायक शहर असल्याचा रिपोर्ट खुद्द पाकिस्तानच्या गृहमंत्रालयानचं दिलाय...

दही खाल्याने डायबेटीजचा धोका कमी

Last Updated: Tuesday, February 18, 2014, 20:14

तुम्हांला दही आवडते का? तर मग अधिक प्रमाणात तुम्ही दही खा... दुग्धजन्य पदार्थ खाल्याने टाइप २ डायबेटीजचा धोका कमी होतो.

`अॅन्ड्रॉईड` वापरताय? सावधान...

Last Updated: Thursday, February 6, 2014, 13:25

सध्या सर्वत्र तरुणाईत अॅन्ड्रॉईड फोनचा वापर लोकप्रिय झालाय. मात्र, हाच वापर तुम्हाला धोकादायक ठरू शकतो.

महिलांनो सावधान ! कॉस्मेटिक वापरताना...

Last Updated: Friday, January 24, 2014, 07:25

महिलांनो कॉस्मेटिक उत्पादने वापरत असाल तर सावधान बाळगा. कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये जीवघेणे घटक वापरले जात असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका आहे. तर काही घटक धोकादायक ठरल्याने कर्करोगाला आमंत्रण देण्याचे काम करीत आहेत.

बिल्डरच्या फायद्यासाठी ‘अमर महल’ ठरली धोकादायक!

Last Updated: Monday, December 2, 2013, 11:52

बिल्डरच्या फायद्यासाठी चेंबूर येथील सुस्थितीतील ‘अमल महल’ बिल्डींग धोकादायक ठरवून तिचं वीज, पाणी बीएमसीनं तोडल्याचा आरोप इथल्या रहिवाशांनी केलाय.

गमतीशीर मोबाईल अॅप्लिकेशन... पण धोकायदायकही!

Last Updated: Thursday, November 28, 2013, 20:10

तुमच्या मोबाईलवर बॉसचा फोन आला... तुम्ही घाईघाईनं तो उचललात आणि पलिकडून आवाज आला तुमच्या मित्राचा... आता तुमचा मित्र बॉससोबत आहे की बॉसचा फोन मित्रानं पळवलाय? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो.

भय इथले संपत नाही! जीव मुठीत घेऊन जगणं सुरू

Last Updated: Friday, November 22, 2013, 10:27

चुनाभट्टीतील स्वदेशी मिलच्या जागेचा वाद कोर्टात सुरु आहे. परंतु या वादाचा फटका मिलच्या जागेत राहणाऱ्या गिरणी कामगारांना बसतोय. लिक्विडेटरच्या ताब्यात मिल असल्यानं इथल्या निवासी इमारतीची ना दुरुस्ती होतंय ना पुनर्विकास. तीन मजली इमारत कधीही कोसळण्याच्या अवस्थेत असून पाचशेहून अधिक जणांचे प्राण धोक्यात आलेत.

पाकच्या सुपर मॉमने दिला पाच मुलांना जन्म

Last Updated: Friday, October 25, 2013, 19:10

निसर्गात आपल्याला अद्भूत चमत्कार पाहायला मिळतात, असाच एक चमत्कार पाकिस्तानात झाला आहे. पाकिस्तानाच्या नैऋत्याला असलेल्या सुपर मॉमने एक नाही दोन नाही तर तब्बल पाच मुलांना जन्म दिला आहे. यात तीन मुली आणि दोन मुलांचा समावेश आहे.

अज्ञात व्यक्तींकडून टोल कर्मचाऱ्यावर गोळीबार

Last Updated: Wednesday, October 16, 2013, 11:42

अज्ञात व्यक्तींनी टोल कर्मचा-यावर गोळीबार केल्याची घटना खेड-शिवापूर टोल नाक्यावर घडली आहे. मंगळवारी रात्री घटना घडली.

राष्ट्रवादीचे शरद पवार काँग्रेसवर नाराज

Last Updated: Saturday, October 12, 2013, 15:15

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी जागावाटपाचा तिढा सुटण्याची शरद पवारांना आशा आहे. दोन्ही पक्षांमधला हा वाद सामंजस्याने सुटेल अशी आशा पवारांनी व्यक्त केलीय. तसंच काँग्रेस पक्षश्रेष्ठींवर नाराज नसल्याचंही त्यांनी सांगितलंय.

कधी होणार पुण्यातील धोकादायक वाडे रिकामे?

Last Updated: Thursday, October 3, 2013, 20:54

पुण्यातही धोकादायक इमारतींमध्ये हजारो लोक राहत असल्याची माहिती पुढे आलीय. विशेष म्हणजे यात महापालिकेच्या वसाहातींचीच संख्या जास्त आहे. महापालिका स्वतःच्याच वसाहतींकडे दुर्लक्ष करत असेल तर, सामान्य पुणेकरांनी महापालिकेकडून काय अपेक्षा ठेवायच्या, असा प्रश्न पुणेकर विचारतायत.

पिंपरी-चिंचवडमधील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर

Last Updated: Wednesday, October 2, 2013, 18:27

पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक इमारती धोकादायक आहेत. त्यावर कारवाईचे आदेश देण्यात आलेत. पण प्रत्यक्षात एकाही इमारतीवर कारवाई झालेली नाही.

सनी लिऑनला मागे टाकून प्रियंका सर्वात धोकादायक सेलिब्रिटी

Last Updated: Wednesday, September 25, 2013, 07:32

आघाडीची अभिनेत्री प्रियंका चोप्राने इंटरनेटवरील सर्वात धोकादायक सेलिब्रिटी हा किताब पटकावला आहे. हॉट सेक्सी सनी लिऑनने गेल्या वर्षी हा किताब पटकावला होता. तिला आता आपल्या देसी गर्ल प्रियंकाने मागे टाकले आहे.

धोकादायक इमारतींचं पाणी सुरू होणार

Last Updated: Thursday, August 8, 2013, 20:25

मुंबईतील अडीच हजार इमारती मुंबई महापालिकेनं धोकादायक घोषित केल्या होत्या. या इमारतींचं तोडलेलं पाणी तातडीनं सुरू करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत.

राज्यातील धरणे धोकादायक, महापुराची भिती

Last Updated: Friday, June 21, 2013, 21:46

उत्तराखंडमध्ये अचानक आलेल्या महापुराच्या दृष्यांनी आपल्या काळजाचा थरकाप उडवला असेल... पण अशीच स्थिती आपल्या शहरात-गावात होऊ शकते, असं तुम्हाला सांगितलं तर..? राज्यातील धरणांची देखभाल आणि तांत्रिक दुरुस्तीच्या कामांकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं जात असून त्यामुळे अनेक धरणं असुरक्षित बनली आहेत. झी २४ तासचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट.

जगातला प्रत्येक सातवा व्यक्ती उपाशी!

Last Updated: Wednesday, June 12, 2013, 16:40

जगभरात प्रत्येक दिवशी २० हजार मुलांच्या पोटात अन्नाचा कणही जात नाही आणि ते भूकेला बळी पडतात. दरवर्षी १ अब्ज ३० कोटी टन खाद्य पदार्थाची नासाडी होते आणि जगातील प्रत्येक सातवा व्यक्ती उपाशी झोपतो... ही सत्य परिस्थिती नुकतीच एका अहवालाच्या माध्यमातून प्रकर्षानं समोर आलीय.

‘पाऊस येतोय, मुंबईतील घरे खाली करा’

Last Updated: Thursday, June 6, 2013, 09:06

आठवडाभरात पाऊस कधीही मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. परिस्थिती हातघाईवर आली असताना इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने अतिधोकादायक म्हणून जाहीर केलेल्या इमारतींत लोक राहत आहेत. त्यांनी तात्काळ घरे खाली करावीत. अन्यथा त्यांना बाहेर काढण्यासाठी फौजदारी करावी लागेल, असा इशारा देण्यात आलाय.

आदित्य पांचोलीने काढला मीडियावर राग

Last Updated: Wednesday, June 5, 2013, 13:48

अभिनेत्री जिया खान हिच्या आत्महत्याप्रकरणी चौकशी पोलिसांनी केली. मात्र, आदित्यचे काय म्हणणे आहे, याबाबत मीडियाने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी मीडियाच्या ट्रायपोडवर गाडी चालवून आदित्य पांचोलीने मीडियावर राग काढला.

शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक

Last Updated: Thursday, May 16, 2013, 07:29

उस्मानाबादमध्ये शेतक-यांच्या संतापाचा उद्रेक झालाय. शासकीय चारा छावणी बंद झाल्यानं संतप्त शेतक-यांनी रास्तारोको आंदोलन केलं..

एडसपेक्षाही घातक आता `सेक्स सुपरबग`

Last Updated: Tuesday, May 7, 2013, 08:14

एडस या जिवघेणा रोगावर अजूनही ठोस असे औषधाउपाचार उपलब्ध झालेले नाही. आणि त्यापेक्षाही घातक अशा `सेक्स सुपरबग` हा नवा रोग नुकताच समोर आला आहे.

हरभजन दोषी होता - नानावटी

Last Updated: Friday, April 12, 2013, 17:08

या प्रकरणाची चौकशी करणारे सुधीर नानावटी यांनी हरभजनला दोषी ठरवले आहे. श्रीशांतवर झालेला हल्ला हा प्रक्षुब्ध बिलकुल नव्हता, असे नानावटी यांनी म्हटले आहे.

भज्जीने मारण्याचा प्लान आधीच केला होता- श्रीशांत

Last Updated: Friday, April 12, 2013, 16:49

टीम इंडियाचे दोन स्टार बॅट्समन विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्या भांडणाने नवं रूप घेतलं आहे. आयपीएल – ६ च्या एका मॅचमध्ये दोघांच्या झालेल्या शाब्दिक चकमकीने मात्र जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.

जयाप्रदा को इतना गुस्सा, कहा लाफा दूंगी

Last Updated: Tuesday, March 12, 2013, 20:46

अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेली नंतर राजकारणात स्थिरावलेली समाजवादी पक्षाची माजी सदस्य जयाप्रदा हिला राग आला. तिचे रागावर नियंत्रण न राहिल्याने पुढे प्रश्न विचारू नका, नाहीतर कानाखाली आवाज काढेन, अशी धमकी एका पत्रकाराला दिली.

ही पहा बाईकवरची जीवघेणी स्टंटस....

Last Updated: Sunday, January 27, 2013, 16:11

लोकांच्या जल्लोषावर विरजण टाकण्याची सवय काही जणांना असते... प्रजासातक दिनी सर्वत्र उत्साहाचं वातावरण असताना, नागपुरात काही अतिउत्साही युवकांनी इतरांना त्रास देण्यातच धन्यता मानली...

प्लास्टिक भांड्यातील चहा, जेवण धोकादायक?

Last Updated: Saturday, October 6, 2012, 12:59

प्लास्टिकच्या कपमध्ये चहा घेणारे आणि प्लास्टिक कोटेड भांड्यामध्ये जेवण करणाऱ्यांनो सावधान ! अशा कपने चहा घेणारे आणि भांड्यामध्ये जेवण करणारे लोक नपुंसक होऊ शकतात, असे संशोधनातून धक्कादायक वास्तव पुढे आले आहे

प. बंगालमध्ये पुरात गेली बस वाहून

Last Updated: Thursday, September 6, 2012, 21:44

प. बंगालमध्ये बांकुरा जिल्ह्यातील झरगाम येथून दुर्गापूर येथे बस जात होती. भैरव बाकी नदी पार करीत असताना आलेल्या पुराच्या लोंढ्यात बस वाहून गेली.

Bank अकाऊंटवर दरोडा..

Last Updated: Monday, August 27, 2012, 22:17

तुमच्या बँक खात्यातील रक्कम दहशतवादी कृत्यासाठी वापरल्यास काय होईल, याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? जर तुम्ही निष्काळजीपणे आपलं एटीएम कार्ड आणि इंटरनेट बँकिंग वापरत असाल तर आताच सावध व्हा.

फेसबुकवरील मित्र आहेत घातक

Last Updated: Thursday, August 9, 2012, 05:41

फेसबुकवर जास्त मित्र असणं हे आजकाल प्रतिष्ठेचे समजले जाते. मात्र आता जास्त मित्र असणे हे घातकही ठरू शकतं.

मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांना आज सुट्टी जाहीर

Last Updated: Friday, June 22, 2012, 11:55

मंत्रालयाच्या आगीच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. तसंच मंत्रालय आज सुरू असणार आहे. पण सर्वसामान्य लोकांसाठी मंत्रालय बंद राहील, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. मंत्रालयाचा विस्तार कक्ष सुरक्षित असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

मंत्रालयातील आगीत तिघांचा मृत्यू

Last Updated: Thursday, June 21, 2012, 22:56

मंत्रालयातील आगीत तीघांचा जणांचा मृत्यू झाला असून दोन जण अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर हे दोन मृतदेह सापडले असून अजून त्यांची ओळख पटलेली नाही. तर तिसरा व्यक्ती संदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

मंत्रालयाचा विमाच नाही!

Last Updated: Friday, June 22, 2012, 07:22

महाराष्ट्रातील अनेक मोठ्या प्रकल्पांचे आणि प्रकरणांची कागदपत्र असणाऱ्या मंत्रालयाला आज दुपारी आग लागली. या आगीत अनेक कागदपत्रे खाक झाली. अनेक मोठ्या वास्तूंचा आणि त्यातील वस्तूंचा विमा उतरविला जातो. परंतु, मंत्रालयाचा विमाच उतरविला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

LIVE : सिक्युरिटी-फायर ऑडिट झालंच नव्हतं...

Last Updated: Thursday, June 21, 2012, 18:40

मंत्रालयाला लागलेल्या आगीबाबत आता नवानवा खुलासा होताना दिसतोय. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार मंत्रालयाचं सिक्युरिटी आणि फायर ऑडिट झालंच नव्हतं असं समजतंय. तसंच तातडीनं उपाययोजना झाल्या नाहीत आणि त्यामुळेच आगीनं उग्र स्वरुपाचं रुप धारण केलं, हेही आता स्पष्ट झालंय.

'आदर्श'ची कागदपत्रे सुरक्षित?

Last Updated: Thursday, June 21, 2012, 18:38

महाराष्ट्राच्या मंत्रालयाला आज दुपारी लागलेल्या आगीत वादग्रस्त आदर्श सोसायटीचे कागदपत्रही जळाले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती.

मंत्रालयाच्या आगीत २४ जण गंभीर जखमी

Last Updated: Thursday, June 21, 2012, 18:40

मुंबईत मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर भीषण आग लागल्याचे वृत्त थोड्याच वेळापूर्वी हाती आली आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. ही आग अत्यंत भीषण आहे.

२५ वाघांची घेतली शिकाऱ्यांनी सुपारी!

Last Updated: Wednesday, May 16, 2012, 17:31

राज्यातील वाघांना शिकारी टोळ्यांपासून धोका निर्माण झालाय. शिकारी टोळ्यांनी २५ वाघांच्या शिकारीची सुपारी घेतल्याची खळबळजनक माहिती गुप्तचरांकडून मिळालीये.

'अजिंठा' आणि 'इष्कजादे' हिट

Last Updated: Friday, May 11, 2012, 23:07

या विकेण्डला बहूचर्चित अजिंठा, यश राज बॅनरचा इशकजादे आणि भट्ट कॅम्पचा डेंजरस इष्क हे चित्रपट भेटीला आलेत. अजिंठा या सतत चर्चेत असमा-या सिनेमाला प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिलीय. तर यशराजच्या प्रेमकहाणीचा फर्म्युलाही पुन्हा हिट ठरलाय.

दहशतवाद्यांचे पुणे, मुंबई, दिल्ली टार्गेट

Last Updated: Thursday, May 10, 2012, 10:53

'लष्कर ए तैयबा'चे सहा संशयित दहशतवादी पुणे, मुंबईसह देशातल्या पाच शहरांवर हल्ला करण्याची शक्यता असल्याचा इशारा केंद्रीय गुप्तचर विभागानं दिला आहे. पुणे, मुंबई, अहमदाबाद, सुरत आणि दिल्ली या पाच शहरांना प्रामुख्यानं धोका असून, पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बोल्ड सिनेमातून करिश्मा परत येतेय

Last Updated: Friday, April 6, 2012, 09:44

विक्रम भट्टच्या 'डेंजरस इश्क' या नव्या ३-डी सिनेमातून करिश्मा कपूर बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. विक्रम भट्टचा सिनेमा आहे म्हटल्यावर तो बोल्ड असणारच. आपल्या काळात करिश्मा कपूरही एक बोल्ड अभिनेत्री म्हणूनच प्रसिद्ध होती.

अतिरेक्यांचा डोळा दगडूशेठ गणपती मंदिरावर

Last Updated: Tuesday, December 6, 2011, 04:58

पुण्यातील अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर होते, अशी माहिती पुढे आली आहे.