17 वर्षीय मुलीसोबत लग्नाची बातमी शोएबनं नाकारलीShoaib Akhtar dismisses marriage rumours

17 वर्षीय मुलीसोबत लग्नाची बातमी शोएबनं नाकारली

17 वर्षीय मुलीसोबत लग्नाची बातमी शोएबनं नाकारली
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून लोकप्रिय असणारा पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनं आपण 17 वर्षीय मुलीशी विवाह करणार नसल्याचं स्पष्ट केलंय. द एक्सप्रेस ट्रॅब्युन (The Express Tribune ) या पाकिस्तानी वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार शोएब अख्तर येत्या 22 जूनला रावळपिंडी इथं 17 वर्षीय रुबाब खानसोबत निकाह करणार आहे. मात्र ट्विट करून शोएबनं हे वृत्त म्हणजे अफवा असल्याचं म्हटलंय.

काय होती बातमी

शोएबचे कुटुंबीय २०१३ साली हजच्या यात्रेला गेले असताना त्यांची ओळख हरिपूर येथील व्यवसायिक मुश्ताक खान यांच्याशी झाली. त्यावेळी शोएबच्या कुटुंबीयांनी शोएबला मुलगी शोधण्यासाठी खान यांच्याकडं मदत मागितली असता खान यांनी आपल्याच मुलीशी शोएबचं लग्न करण्याचं सुचवलं. त्यानंतर अनेकदा दोन्ही कुटुंबं एकमेकांना भेटली. अखेर शोएब आणि मुस्ताक खान यांची १७ वर्षीय मुलगी रुबाब खान यांचं लग्न ठरलं.

शोएब १२ जून रोजी आपल्या गावी रावळपिंडीला जाणार आहे. हे लग्न पारंपरिक पद्धतीने होणार आहे. मेहंदी १९ जून रोजी असून हरीपूरमधील बिलावल हॉलमध्ये २० जून रोजी रुखसतीचा कार्यक्रम पार पडणार आहे. तर २२ जूनला रावळपिंडीला वालीमाचा कार्यक्रम होणार आहे. रुबाबला क्रिकेटचे फारसे वेड नसून तिला तीन मोठे भाऊ आणि एक लहान बहिण आहे.
मात्र ही सर्व अफवा असून मी 17 वर्षीय मुलीशी निकाह करणार नाही, असं शोएबनं स्पष्ट केलंय.















* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, June 8, 2014, 09:22


comments powered by Disqus