Last Updated: Friday, November 22, 2013, 14:22
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई टीम इंडियाचे सर जडेजा म्हणजेच रवींद्र जडेजानं यंदाच्या सर्वाधिक विकेट घेण्याचा मान पटकवला आहे. त्यानं आपल्या रेकॉर्डनं यंदाच्या वर्षी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पाकिस्तानच्या सईद अजमलला पराभूत केलंय.
वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये रवींद्रनं ३७ धावा घेवून तीन विकेट घेतल्या. कोची वन डेमध्ये त्यानं डॅरेन सॅमीला बाद करुन यंदाची ४९वी विकेट मिळवली. रवींद्रनं वर्षभरात २९ वन डेमधून ४९ विकेट घेतल्या आहेत.
सॅमीच्या विकेटनंतर रवींद्रनं पाकिस्तानच्या सईद अजमलला पराभूत मागे टाकलंय. सईदनं २५ वन डे खेळून ४८ विकेट मिळवल्या आहेत. यंदाच्या वर्षी सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांमध्ये सईद अव्वल स्थानावर होता. मात्र आपल्याला अजून विश्वविक्रमांचा बराच पल्ला गाठायचा आहे, असं सर जडेजा म्हणाले
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, November 22, 2013, 14:22