Last Updated: Thursday, May 16, 2013, 13:21
www.24taas.com,झी मीडिया, नवी दिल्ली आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे क्रिकेट वर्तुळात खबळ उडाली आहे. राजस्थान रॉयल्सचे तीन खेळाडूंना स्पॉट फिक्सिंगप्रकरणात अटक करण्यात आलीये. या खेळाडूंना निलंबित कऱण्यात आले आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पॉट फिक्सिंग प्रकरणी कडक पाऊले उचललीत. एस. श्रीसंत, अंकीत चव्हाण, अजित चंदेलिया या सर्व तीन राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंना तात्काळ निलंबित केले आहे. बीसीसीआयचा कारभार स्वच्छ आहे. भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, असं बीसीसीआयनं ही कारवाई करताना म्हटलंय. भारतीय क्रिकेट बोर्डाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी रत्नाकर शेट्टी यांनी कारवाईबाबत ही माहिती दिली.
पोलिसांनी तीन खेळाडूंना अटक केली. तर तीन बुकींनाही अटक केलेय. तर फरार झालेल्या दोन बुकींच्या शोधात दिल्ली पोलीस आहेत. मुंबईत दिल्ली पोलिसांनी धाड टाकली आणि हॉटेल्समधून सात बुकींना अटक केली. तर दिल्लीत तिघांना अटक करण्यात आलेय. आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगप्रकरणामुळे क्रिकेट वर्तुळात खबळ उडाली आहे.
दरम्यान, श्रीसंत याचे करिअर संपविण्यात भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि गोलंदाज हरबजन सिंग या दोघांचा हात आहे, असा आरोप श्रीसंत याच्या वडिलांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण लागण्याची आहे. श्रीसंत याच्या अटकेसाठी महेंद्रसिंग धोनी आणि हरभजन सिंग जबाबदार आहेत. एका वृत्तवाहिनी श्रीशांत याचे वडील बोलत होते. या दोघांनी कट रचून श्रीशांतला अडकविले आहे. धोनीला श्रीशांत नको होता. धोनीने धमकी दिली होती, तुझे करिअर संपुष्टात आणण्याची. ही माहिती यावेळी श्रीसंतच्या वडिलांनी दिली.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, May 16, 2013, 13:20