Last Updated: Thursday, May 16, 2013, 14:18
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीस्पॉट फिक्सिंगदरम्यान एस. श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजित चंडालिया आणि या राजस्थान रॉयल्सच्या तिन्ही खेळाडुंना बीसीसीआयने आयपीएलमधून सस्पेंड केलंय. स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांमुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत या खेळाडुंना खेळता येणार नाही असं बीसीसीआयने स्पष्ट केलंय.
दरम्यान या स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचं कनेक्शन नेमकं कुठे कुठे आहे याचा तपास दिल्ली पोलीस करतायत...स्पॉट फिक्सिंगचं कनेक्शन पाकिस्तान तसंच दुबईमध्येही असल्याचा संशय व्यक्त केला जातोय....तसंच दिल्ली पोलिसांच्या मोबाईल सर्व्हेलन्स टीमचे ब्रजेश दत्त यांचं या प्रकरणाशी काही कनेक्शन आहे का याचा ही तपास दिल्ली पोलीस करतायत.
ब्रजेश दत्त यांच्यावर बुकींवर पाळत ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र दत्त यांचा मृतदेह शनिवारी गुडगावममधल्या एका फ्लॅटमध्ये संशयास्पदरित्या आढळून आल्याने या हत्येचं कनेक्शन या स्पॉट फिक्सिंग प्रकरणाशी असावं असा संशय दिल्ली पोलिसांनी व्यक्त केलाय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, May 16, 2013, 14:17