वेस्ट इंडीज टेस्टसाठी भारतीय टीमची आज निवडTeam selection for West Indies test series today in Mumbai

वेस्ट इंडीज टेस्टसाठी भारतीय टीमची आज निवड

वेस्ट इंडीज टेस्टसाठी भारतीय टीमची आज निवड
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सचिनच्या निरोपाच्या मॅचसाठी आज टीम इंडियाची निवड केली जाणार आहे. म्हणजेच वेस्ट इंडीज टेस्ट सीरिजसाठी टीम इंडिया आज निवडली जाईल. मुंबईत होणाऱ्या या बैठकीत संदीप पाटील आणि कंपनीसमोर सर्वात मोठा प्रश्न आहे, तो बॉलर्सचाच.

कारण, ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे सीरिजमध्ये भारताचे बॉलर्स माती खातांना दिसले. कांगारूंना रन्सची त्यांनी खिरापतच वाटली. याची शिक्षा बॉलर्संना मिळणार का? हे आज स्पष्ट होणार आहे. कारण वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड आज केली जाणार आहे.

एकीकडे ईशांत शर्माचं काय होणार हा प्रश्न आहे, तर दुसरीकडे झहीर खान आणि उमेश यादव फिट झाले आहेत, असं असलं तरीही धोनी म्हणाला की माहित नाही चांगली बॉलिंग म्हणजे काय? नागपूर वन-डे मॅचमध्ये विजयी शिखर गाठल्यानंतर धोनी बोलत होता. बॉलर्संचा फॉर्म सध्या खराब आहे. मात्र कोणत्याही नव्या नियमाचं पालनं बॅट्समन पेक्षा बॉलर्स लगेच करतात.

त्यामुळं आता वेस्ट इंडीजसोबत होणाऱ्या टेस्ट सीरिजसाठी कोण-कोणत्या बॉलर्सची निवड होते, हे बघणं औत्सुक्याचं ठरेल.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, October 31, 2013, 11:24


comments powered by Disqus