भारताची तिसरी विकेट, द्रविड आऊट - Marathi News 24taas.com

भारताची तिसरी विकेट, द्रविड आऊट

झी २४ तास वेब टीम, मेलबर्न
 
बॉक्सिंग डे टेस्ट मध्ये गंभीर, सेहवाग पाठोपाठ राहुल द्रविडही आऊट झाला आहे. फक्त १० रन्सवर पॅटिन्सनने द्रविडला क्लीन बोल्ड  केलं. आता सचिन तेंडुलकरला मैदानावर साथ द्यायला व्हि व्हि एस लक्ष्मण मैदानात उतरला आहे.
 
मॅचचा LIVE स्कोर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.
मेलबर्न टेस्ट मॅचच्या चौथ्या दिवशी टीम इंडयानं लंचपर्यंत १ विकेट गमावून २४ रन्स केले होते. दुसऱ्या सेशनमध्ये भारतीय बॅट्समन कशी कामगिरी करतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. टीम इंडियाच्या बॅट्समनना ऐतिहासिक विजय मिळविण्यासाठी जबाबदारीनं खेळ करावा लागणार आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियानं ठेवलेलं २९२ रन्सचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय टीमची  सुरुवात अतिशय खराब झाली. पहिल्या इनिंगमध्ये हाफ सेंच्युरी ठोकलेल्या वीरेंद्र सेहवागला दुसऱ्या इनिंगमध्ये आपल्या बॅटची जादू दाखवता आली नाही. तो ७ रन्सवर हिलफेनहॉसच्या बॉलिंगवर आऊट झाला आणि टीम इंडियाला पहिला धक्का बसला.
 
बॉक्सिंग -डे टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलियानं टीम इंडियासमोर विजयासाठी २९२ रन्सचं टार्गेट ठेवलं आहे. मायकल हसीच्या ८९ रन्स आणि रिकी पॉन्टिंगच्या ६० रन्सच्या जोरावर कांगारुंना २४० रन्सपर्यंत मजल मारता आली. त्यानंतर जेम्स पॅटिनसन आणि बेन हिलफेनहॉसनं शेवटच्या विकेटसाठी ४३ रन्सची पार्टनरशिप केली. कांगारुंच्या इनिंगमध्ये ही पार्टनरशिप महत्वाची ठरली. पॅटिनसननं नॉटआऊट ३७ रन्सची इनिंग खेळली.  भारताकडून उमेश यादवनं चार विकेट्स, झहीर खाननं ३ विकेट्स आणि ईशांत शर्मानं दोन विकेट्स घेतल्या. टीम इंडियाच्या फास्ट बॉलर्सनी या टेस्टमध्ये भेदक मारा केला. मात्र, तळाच्या बॅट्समनना गुंडाळण्यात बॉलर्सना अपयश आलं. आता,  मेलबर्नमध्ये ऐतिहासिक विजय मिळविण्यासाठी टीम इंडियाच्या बॅट्समनना जबरदस्त बॅटिंग करावी लागणार आहे.

First Published: Thursday, December 29, 2011, 09:17


comments powered by Disqus