ऑस्ट्रेलियन मीडियाचे टीम इंडियावर ताशेरे - Marathi News 24taas.com

ऑस्ट्रेलियन मीडियाचे टीम इंडियावर ताशेरे


www.24taas.com, पर्थ
 
ऑस्ट्रेलियन मीडियानं टीम इंडियावर जोरदार हल्लाबोल केला आहे. महेंद्रसिंग धोनी निष्क्रिय कॅप्टन असल्याच म्हणत त्यांनी धोनीलाही टीकेच लक्ष्य केलं आहे. व्हीव्हीएस लक्ष्मणनं कांगारु बॉलर्ससमोर सपशेल शरणागती पत्करली आहे. त्याचप्रमाणे जवळपास सर्वच दौऱ्यात ट्रम्प कार्ड ठरणारे बॅट्समनच भारताच्या पराभवाला कारणीभूत ठरले आहेत असही ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रांनी म्हटलं आहे.
 
ऑलस्ट्रेलियन दौ-यावर गेल्यावर ऑस्ट्रेलियन मीडीयाच्या रडारवर नेहमीच भारतीय टीम असते. टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंना वेगवेगळ्या मार्गानी टार्गेट केलं जातं. भारतीय टीमसाठी मिशन ऑस्ट्रेलिया असतं तर कांगारु मीडियासाठी नेहमीच टार्गेट टीम इंडिया असते. काहीवेळेस ते भारतीय क्रिकेटपटूंवर अनाठायी टीका करत असतात.
 
मात्र, या दौऱ्यात भारताच्या खराब कामगिरीमुळे त्यांना भारतीय क्रिकेटपटूंना टार्गेट करण्याची नामी संधी मिळाली आहे. भारतानं टेस्ट सीरिज गमावली आहे. ऍडलेडमध्ये भारतीय टीम प्रतिष्ठा वाचवण्यासाठी खेळणार आहे. मात्र, त्याआधी ऑस्ट्रेलियन मीडिया भारतीय क्रिकेटपटूंवर हल्ला करत त्यांच मानसिक खच्चीकरण करत आहे.
 
 

First Published: Tuesday, January 17, 2012, 14:10


comments powered by Disqus