केकेआरने शेवटच्या ओव्हरमध्ये हरवून दाखवलं - Marathi News 24taas.com

केकेआरने शेवटच्या ओव्हरमध्ये हरवून दाखवलं

www.24taas.com, चेन्नई
 
आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सचा थरारक असा विजय झाला आहे.सामना अखेरच्‍या षटकापर्यंत रंगला. युसुफ पठाण बाद झाल्‍यामुळे कोलकात्‍याचा अडचणी वाढल्या होत्या. परंतु, देवब्रत दासने चौकार खेचून कोलकात्‍याचा विजय साकारला. कोलकात्‍याने ५ विकेट्सने रोमहर्षक विजय मिळविला.
ऐन मोक्‍याच्‍या क्षणी गौतम गंभीर बाद झाल्‍यामुळे कोलकाता नाईट रायडर्स अडचणीत आले होते. विजयासाठी 12 चेंडुत 16 धावांची गरज असताना गंभीर पायचित झाला. त्‍यामुळे सामना रोमांचक स्थितीत आला होता. गंभीर 52 चेंडुंमध्‍ये 63 धावा काढून बाद झाला. त्‍यानंतर युसुफ पठाणवर कोलकात्‍याचा विजय साकारण्‍याची जबाबदारी होती.
 
परंतु, त्‍याला बांधून ठेवण्‍यात चेन्‍नईच्‍या गोलंदाजांना यश आले. अखेरचे षटक अश्विनने टाकले. त्‍याच्‍या दुसरावर पठाण फसला. मिडविकेटवरुन उंच फटका मारण्‍याच्‍या नादात पठाण बाद झाला. त्‍यावेळी कोलकात्‍याच्‍या हातातून विजय निसटतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु, पुढच्‍याच चेंडूवर दासने चौकार मारून विजय मिळवून दिला. दासने महत्त्वाच्‍या क्षणी 4 चेंडुंमध्‍ये 2 चौकारांसह 11 धावांची अतिशय मोलाची खेळी केली.
 
 
 

First Published: Tuesday, May 1, 2012, 00:11


comments powered by Disqus