Last Updated: Wednesday, April 9, 2014, 13:53
www.24taas.com, झी मीडिया, जोधपूरढाकामध्ये टी-२० वर्ल्डकप फायनलमध्ये श्रीलंकेच्या हातून झालेल्या पराभवानंतर लगेच दोन दिवसांनीच म्हणजे मंगळवारी टीम इंडियाचा उप-कर्णधार आणि ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’ विराट कोहली थेट पोहोचला जोधपूरमध्ये... अभिनेत्री अनुष्का शर्माला भेटण्यासाठी.
अनुष्का शर्मा सध्या जोधपूरला चित्रपट ‘एनएच १०’चं शूटिंग करतेय. शेड्यूलनुसार बुधवारी तिला बुधवारी जोधवूरला पोहोचायचं होतं. मात्र विराट ढाकाहून व्हाया दिल्ली थेट जोधपूरला पोहोचला. तेव्हा अनुष्काही मुंबईहून शेड्यूलच्या एक दिवस आधीच जोधपूरला आली. नंतर दोघंही खेजडला किल्लावर पोहोचले. तिथं रात्री उशीरापर्यंत ते एकत्र होते.
काही महिन्यांपूर्वी जेव्हा टीम इंडिया न्यूझिलंड दौऱ्यावर होती. तेव्हा अनुष्का विराटला भेटायला तिथं गेली होती. नंतर दोघं रस्त्यावर कसे फिरत होते याचे फोटोही प्रसिद्ध झाले होते. तर टीम इंडिया ढाक्याला जाण्यापूर्वी अनुष्का श्रीलंकेत होती तेव्हा विराट तिथं गेला होता.
अनुष्काला बुधवारी जोधपूरला पोहोचायचं होतं, मात्र ती एक दिवस आधी म्हणजे मंगळवारीच आली. एअरपोर्टमधून बाहेर पडल्यावर अनुष्का सरळ खेजडला किल्लावर गेली. तिथं विराट आधीपासूनच तिची वाट पाहत होता. लाईन प्रोड्यूसर ज्ञानेंद्र सिंह राठोड यांनी सांगितलं की चित्रपटाचं शूटिंग १० एप्रिलपर्यंत सुरू राहील.
विराट कोहलीचं एअर इंडियाचं फ्लाईट दुपारी १२.१५ला जोधपूरला पोहोचलं. तर अनुष्का एका तासानंतर जेट एअरवेजच्या विमानानं आली. यादरम्यान विराट खूप वेळ एअरपोर्टच्या व्हीआयपी लाऊंजमध्ये बसला होता. मात्र नंतर मुंबईची फ्लाईट लँड व्हायच्या काही वेळ आधी तो मीडियापासून वाचत हॉटेल विवांता हरी पॅलेसला निघून गेला. दोघांच्या भेटीची बातमी लपविण्यासाठी विराट कोणत्यातरी जाहिरातीच्या शूटिंगसाठी आल्याचं पसरवण्यात आलं. मात्र त्यानंतर अनुष्काला एअरपोर्टवर पाहिल्यानंतर खरं काय ते पुढं आलं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, April 9, 2014, 13:53