`विराट`च्या चाहतीची गळफास लावून आत्महत्या, virat kohli`s fan commit suicide

...आणि 'विराट'चं नाव घेतंच तिनं मरण पत्करलं!

...आणि 'विराट'चं नाव घेतंच तिनं मरण पत्करलं!
www.24taas.com, भोपाळ

टीम इंडियाचा आघाडीचा स्टार क्रिकेटपटू आणि आघाडीचा फलंदाज विराट कोहलीच्या एका चाहतीनं आत्महत्या केलीय. ही मुलगी विराटवर एवढी फिदा झाली होती की अंतिम श्वास घेण्याआधी आपल्या वडिलांना लिहिलेल्या चिठ्ठितही तीनं विराटसाठी एक मॅसेज लिहून ठेवलाय.

मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ इथली ही घटना आहे. संबंधित मुलगी इंजिनिअरिंगची विद्यार्थीनी आहे. आपल्या आजाराला कंटाळून या तरुणीनं गळफास लावून आत्महत्या केलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोपाळच्या अवधपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या लवकुश नगरमध्ये एका भाड्याच्या घरात १८ वर्षीय आरती सोनी आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती. तिचे वडील कानपूरच्या पंजाब नॅशनल बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत होते. आरती गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होती. शेवटी कंटाळून या तरुणीनं आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

गळफास लावून घेण्याअगोदर या मुलीनं आपल्या वडिलांसाठी एक चिठ्ठी लिहून ठेवलीय. यामध्ये तीनं आपण विराट कोहलीची ‘फॅन’ असल्याचंही नमूद केलंय. ‘जर कधी विराट तुम्हाला भेटला तर त्याला सांगा की आरती खूप चांगली मुलगी होती’ असंही तीनं आपल्या वडिलांना उद्देशून लिहिलंय.

First Published: Tuesday, January 8, 2013, 13:54


comments powered by Disqus